आता फितुरी केले तर परिणाम भोगावेच लागतील, रोहित पवार यांची मिंधे गटाचे आमदार शहाजी बापू यांच्यावर टीका

भाजपचे राजकारण हिडीस, बलात्कारासारखे आहे अशी टीका मिंधे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली होती. त्यावर आता फितुरी केले तर परिणाम भोगावेच लागतील अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
सांगोला नगरपरिषद निवडणुकीत भाजप नेतृत्वाने मिंध्यांचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना एकाकी पाडत शेकापसह सर्व पक्षीय आघाडी करुन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या या राजकीय खेळीने शहाजीबापू चांगलेच संतप्त झालेत. भाजपने केलेली ही खेळी हिडीस, किळसवानी, दहशतवादी आणि एखाद्या अबलेवर केलेली बलात्कारी कृती असल्याचे सांगत पाटलांनी भाजपावर आसूड ओढत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
यावर रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्राची राजकीय सुसंस्कृत परंपरा यासंदर्भात शहाजी बापूंनी गुवाहाटीच्या दऱ्या, डोंगर, हिरवळ, हाटेल बघण्याआधी विचार करायला हवा होता. आता फितुरी केले तर परिणाम भोगावेच लागतील, स्वाभिमान गहाण टाकावाच लागेल. असो उशिरा का होईना शहाणपण सुचलं ते महत्वाचं आहे असेही रोहित पवार यांनी यावेळी म्हटले.
महाराष्ट्राची राजकीय सुसंस्कृत परंपरा यासंदर्भात शहाजी बापूंनी गुवाहाटीच्या दऱ्या, डोंगर, हिरवळ, हाटेल बघण्याआधी विचार करायला हवा होता. आता फितुरी केले तर परिणाम भोगावेच लागतील, स्वाभिमान गहाण टाकावाच लागेल. असो उशिरा का होईना शहाणपण सुचलं ते महत्वाचं आहे .@शहाजीबापू pic.twitter.com/cAzqUAnHzD
– रोहित पवार (@RRPSpeaks) 19 नोव्हेंबर 2025

Comments are closed.