उज्ज्वला थिटेंची राजन पाटलांविरुद्ध सर्वात मोठी चाल, अर्ज बाद झाल्यानंतर अनगरमध्ये मोठा ड्रामा
Mohol Angar Nagar Panchayat Ujjwala Thite News : अनगर नगरपंचायतीच्या (Angar Nagar Panchayat) नगराध्यक्ष पदासाठी उज्वला थिटे (Ujjwala Thite) यांचा अर्ज बाद झाला आहे. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटे याच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याचे आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्वला थिटे यांनी पाहिली प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उज्वला थिटे यांनी दिली आहे.
Ujjwala Thite: सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, त्याचीच सही कशी राहू शकते?
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती उज्वला थिटे यांनी दिली आहे. अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि अर्जाची वकिलाकडून तपासणी केली होती. सूचक म्हणून माझा मुलगा माझ्यासोबत होता, त्याचीच सही कशी राहू शकते? असा सवाल उज्वला थिटे यांनी केला. मी न्यायाल्यावर विश्वास ठेवते, अर्ज कसा बाद झाला? यासंदर्भात मी न्यायालयात दाद मागेन असे थिटे म्हणाल्या. तर अर्ज भरताना सर्व कागदपत्रांची आणि अर्जाची वकिलाकडून तपासणी केली होती
सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, त्याचीच सही कशी राहू शकते? मी न्यायालयावर विश्वास ठेवते, अर्ज कसा बाद झाला यासंदर्भात मी न्यायालयात दाद मागेन, मला गेल्या अडीच वर्षांपासून आता लढा देण्याची सवय लागली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Ujjwala Thite: माझ्या अर्जातून चार कागद बाद करायला त्यांना असा कितीसा वेळ लागणार
पुढे त्या म्हणाल्या, राजन पाटील यांचा कट पाहा. पूर्वीपासूनच सर्वांना कल्पना होती, यांच्या विरोधात एखादा व्यक्ती गेला तर तो व्यक्ती पुन्हा भविष्यात उभा राहू नये असे त्यांचे प्रयत्न असतात, त्याचं मतदार यादीतून नाव काढणे, घर जाळणे हे सर्व सगळ्यांना माहिती आहे, मी भविष्यात त्यांच्यासोबत लढणार म्हणून मी माझी मतदार यादीतून नाव काढण्याचा पहिलाच प्रयत्न चालू केला आणि आता स्वतः ते म्हणतात, 302 ची कलम आम्ही भोगणारे आणि माझ्या मुलाला मी 302 च्या कलमातून बाहेर काढला आहे, मी ज्यावेळी मुलाला घेऊन माफी मागायला गेले, त्यावेळी त्यांनी मला सांगितलं खूप जर गोंधळ केला तर मी 302 कलमातून मुलाला सोडवला आहे, माझ्यासमोर हा असला हट्टीपणा चालणार नाही, जेव्हा तुम्ही अशा मोठ्या गुन्ह्यातून मुलाला सोडवता, मग अशा माझ्या अर्जातून चार कागद बाद करायला त्यांना असा कितीसा वेळ लागणार आहे, असंही उज्वला थिटे यांनी म्हटलं आहे.
Ujjwala Thite: आता त्यात हा नवीन कुटाणा आहे
तिथे आम्ही तिथे दोघेच होतो, दहशती पोटी तिथं कोणी छाननीसाठी येणार नव्हतं, निवडणूक अधिकारी आहेत त्यांना सांगितलं होतं मी सर उद्या सकाळी 11 वाजता छाननी आहे, पण आम्ही दोघे येऊ शकत नाही, ते म्हणाले वकील येतील का, इतक्या दहशती खाली कोणताही वकील तिथे उपस्थित राहणार नाही, याचाच फायदा त्यांनी तिथे घेतला, तिथे आमचा वकील छाननीसाठी गेला नव्हता, आम्ही सर्व कागदपत्रांची पूर्तता कलेक्टरांच्या सांगण्यावरून केली होती, पाटील परिवारा विरुद्ध माझा लढा याआधीपासून चालू आहे, मुलाच्या दाखल्यावरची केस बाल हक्क आयोगात चालू आहे, पोलिसांनी पुरावे मिटवले, त्याची केस मानवी हक्क जवळ चालू आहे, आता त्यात हा नवीन कुटाणा आहे, आता जिल्हा न्यायालयाला जायचं यांच्या विरोधात, किंवा माझा अर्ज का बाद केला म्हणून, याबाबत मी न्यायालय लढा देणार आहे, मला आता ती सवय झाली आहे, गेले अडीच वर्ष मी घरदार सोडून पाटील परिवारामुळे मला बोंबलत फिरायची वेळ आली आहे, आता कायद्याशिवाय मी कुठे जाणार, यांच्यासारखे गुंडागर्दी करायला आमच्याकडे गुंड नाहीत, मी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारी महिला आहे असाही पुढे त्यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.