भारत अन् दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेआधी रोहित शर्माला मोठा धक्का; नेमकं काय घडलं?


आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्मा अपडेट: 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत–दक्षिण आफ्रिका वनडे (India vs South Africa ODI) मालिकेच्या अगोदर टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तीन आठवडे आयसीसीच्या एकदिवसीय वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) अव्वल स्थान राखल्यानंतर हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा खाली घसरला आहे. हिटमॅन आता दुसऱ्या स्थानावर घसरला असून त्याची जागा न्यूझीलंडच्या तुफानी फलंदाज डेरिल मिचेलने (Daryl Mitchell) घेतली आहे. मिचेल 782 गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे, तर रोहितकडे 781 गुण असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मिचेलची तुफानी खेळी अन् ऐतिहासिक कामगिरी….

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडेत मिचेलने आपल्या कारकिर्दीतील सातवे शतक ठोकले. 118 चेंडूत 119 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह त्याने न्यूझीलंडला 7 धावांनी विजय मिळवून दिला. या शतकी खेळीमुळेच त्याने रँकिंगमध्ये झेप घेतली. विशेष म्हणजे, दुसऱ्या वनडेत त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. मिचेल हा वनडे रँकिंगमध्ये नंबर वनवर पोहोचणारा न्यूझीलंडचा फक्त दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1979 मध्ये ग्लेन टर्नर हा यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला होता.

रोहितकडे पुन्हा नंबर वन होण्याची सुवर्णसंधी (Rohit Sharma loses top spot in ODI rankings)

रोहित आणि मिचेल यांच्यात फक्त 1 गुणाचा फरक आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दाखवलेला फॉर्म कायम ठेवला, तर तो पुन्हा नंबर वनची गादी सहज पुन्हा मिळवू शकतो.

टॉप-10 मध्ये भारताची पकड कायम

टॉप-10 यादीत अजूनही भारतीय वर्चस्व दिसते आहे, कारण रोहितशिवाय, इतर तीन भारतीय फलंदाज टॉप 10 मध्ये आहेत. शुभमन गिल चौथ्या, विराट कोहली पाचव्या आणि श्रेयस अय्यर आठव्या स्थानावर आहेत. भारताचे चार प्रमुख खेळाडू टॉप-10 मध्ये असल्याने टीम इंडियाची मजबूत उपस्थिती कायम असल्याचे स्पष्ट होते.

टी20 अन् कसोटीत भारतीय खेळाडू अव्वल स्थान कायम

गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचे टी-20 मध्ये वर्चस्व या आठवड्यातही कायम राहिले. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटीत अव्वल स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा रशीद खान एकदिवसीय सामन्यात अव्वल स्थानावर आहे.

पाकिस्तानी फलंदाजांचाही फायदा…

श्रीलंका–पाकिस्तान मालिकेनंतर पाकिस्तानी खेळाडूंचीही रँकिंग सुधारली आहे. मोहम्मद रिजवान पाच स्थानांची उडी घेत 22व्या स्थानी आला आहे, तर फखर जमान 26व्या स्थानी पोहोचला आहे.

हे ही वाचा –

Ranji Trophy 2025-26 Manipur Lamabam Singh OUT : ना कॅच, ना स्टम्पिंग, ना रनआऊट, तरीही फलंदाज OUT! सगळेच चक्रावले; रणजी ट्रॉफीमध्ये नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.