Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil य़ांची औकात आहे का?; मिटकरी कडाडले

Amol Mitkari : अजित पवारांवर बोलण्याची Balraje Patil य़ांची औकात आहे का?; मिटकरी कडाडले
अजित पवारांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका होत असताना आमचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गप्प का?, : आमदार अमोल मिटकरी. अजितदादांवर बोलण्याची बाळराजेची औकात आहे का?, मिटकरी गरजलेत.   अँकर : एकनाथ शिंदेंवर कुणी बोललं तर त्यांचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घालतात… मग अजित पवारांवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका होत असताना आमचे वरिष्ठ नेते आणि मंत्री गप्प का?, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. ते अकोला येथे ‘एबीपी माझा’शी बोलत होतेय. अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीतील विजयानंतर बाळराजे पाटील यांनी अजित पवारांना दिलेल्या चॅलेंजला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. बाळराजे पाटील यांची अजित पवारांवर बोलण्याची औकात आहे का?, असं सवाल त्यांनी केलाय. बाळराजाच्या वडिलांना सोलापूर जिल्ह्यात मालक म्हटलं जातंय. त्यांच्या अवलादी त्यांना भिकारी केल्याशिवाय राहणार नाही, असा सणसणीत टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावलाय. जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट करणार असाल तर राष्ट्रवादी त्याच पद्धतीने उत्तर देईल, असा इशारा यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी दिलाय. बाळराजे पाटील, तानाजी सावंत, अंजली दमानिया यांसारखे लोक कुणाच्या भरवशावर अजित पवारांना लक्ष करत आहेत?, असं सवाल त्यांनी केलाय. दरम्यान, थेट अजित पवारांना आव्हान देणाऱ्या बाळराजेला भाजपचं समर्थन आहे का?, भाजप त्याच्यावर कारवाई करणार का?, असा सवालही यावेळी आमदार मिटकरी यांनी केलाय. राजन पाटील आणि त्यांची दोन्ही मुलं आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या तुकड्यावर जगलीत, अशी आठवणही यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी करून दिलीय. आमदार अमोल मिटकरी यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी उमेश अलोणे यांनी…

Comments are closed.