अंडर-19 वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान एकमेकांविरुद्ध भिडणार नाहीत? आयसीसीचा मोठा निर्णय!

अंडर 19 पुरुष विश्वचषक 2026 चं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) वेळापत्रक जाहीर केलं आहे. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना होणार नाही, हा एक मोठा आणि आश्चर्यकारक निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत 16 संघ सहभागी होत आहेत, ज्यांना चार गटांमध्ये विभागले गेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा मोडत, आयसीसीने यावेळी भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळ्या गटात ठेवलं आहे, ज्यामुळे गट टप्प्यात संघ एकमेकांशी भिडताना दिसणार नाहीत.

गेल्या वर्षभरात भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. यामुळे भारत-पाकिस्तान सामने स्थगित करण्याची अनेकदा मागणी झाली आहे. असं असूनही बऱ्याचशा चर्चांनंतर आशिया चषक 2025 (Asia Cup 2025) खेळवण्यात आला आणि भारतीय संघाने तीन वेळा पाकिस्तानला पराभूत केलं. तर महिलांच्या आयसीसी वनडे विश्वचषकातही भारत-पाक सामना झाला. पण अंडर 19 विश्वचषकात आयसीसीने (ICC) दोन्ही संघांना वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2026 नामिबिया व झिम्बाब्वेमध्ये खेळवला जाणार आहे. वनडे फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेला येत्या 15 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. तर 6 फ्रेब्रुवारीला अंतिम सामना खेळवला जाईल. या स्पर्धेतील 16 संघांना चार गटात विभागलं आहे. 6 वेळचा वर्ल्डकप विजेता भारतीय संघ अ गटात आहे. या गटात न्यूझीलंड, बांगलादेश आणि अमेरिकेसह टीम इंडियाचा समावेश आहे. स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि अमेरिका यांच्यात झिम्बाब्वेच्या बुलावायो येथे खेळवला जाईल.

अंडर-19 विश्वचषक 2026 मधील गट

अ गट – भारत, न्यूझीलंड, बांगलादेश, अमेरिका

ब गट – झिम्बाब्वे, इंग्लंड, स्कॉटलंड, पाकिस्तान

क गट – ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जपान व श्रीलंका

ड गट – टांझानिया, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका

अंडर-19 विश्वचषक 2026 मधील भारतीय संघाचं वेळापत्रक
१५ जानेवारी – भारत विरुद्ध अमेरिका – बुलावायो
१७ जानेवारी – भारत विरुद्ध बांगलादेश – बुलावायो
24 जानेवारी – भारत वि. न्यूझीलंड – बुलावायो

Comments are closed.