वनडे टीमची घोषणा होण्याआधी हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय! बुमराहबाबतही मोठी अपडेट समोर

कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची व्हाईट-बॉल टीम लवकरच जाहीर होणार आहे. पण याचदरम्यान मोठी चर्चा अशी आहे की, हार्दिक पांड्याने (Hardik pandya) या वनडे मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर तीन सामन्यांच्या मालिकेत जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती देण्याचा विचार निवड समितीने केला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील पहिला वनडे 30 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे.

हार्दिक पांड्या बराच काळ रेस्टवर होता आणि त्यामुळे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हार्दिक पुन्हा मैदानात उतरेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. पण आता हार्दिकने मालिकेतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतल्याने चाहते निराश झाले आहेत. मात्र त्यामागे मोठं कारण आहे.

सध्या आपल्या गर्लफ्रेंड माहिका शर्मा सोबत सुट्ट्या घालवत असलेला हार्दिक पांड्या वर्कलोड मॅनेजमेंट आणि पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकाचा विचार करून या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. इतकंच नाही, तर तो टी20 विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही खेळणार नाही, जेणेकरून तो पूर्णपणे टी20 आणि या छोट्या फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करू शकेल.

बीसीसीआयच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, हार्दिक सध्या आपल्या दुखापतीतून चांगला सावरत आहे. तो सेंटर ऑफ एक्सलन्स (पूर्वीचे NCA) येथे आवश्यक दिनचर्या पूर्ण करत आहे. त्याला वर्कलोडची भरपाई करायची आहे आणि अशा स्थितीत त्याने वनडे मालिकेत खेळणे धोकादायक ठरेल. त्यामुळे टी20 विश्वचषक सुरू होईपर्यंत बीसीसीआयची मेडिकल टीम आणि हार्दिक, दोघेही फक्त टी20 वर लक्ष केंद्रित करतील.

Comments are closed.