हिंदुस्थानवर हल्ला करू असा इशारा दिलेला, आमच्या सैनिकांनी ते केलं; दिल्ली स्फोटात सामील असल्याची पाकिस्तानची कबुली

पाकव्याप्त कश्मीरचे (पीओके) माजी पंतप्रधान चौधरी अन्वर-उल-हक यांनी हिंदुस्थानात दहशतवादी हल्ल्यांची कबुली दिली आहे. अन्वरुल हक यांनी कबूल केले आहे की, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लाल किल्ल्यापासून कश्मीरपर्यंत हिंदुस्थानला लक्ष्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओही समोर आला आहे.

अन्वर-उल-हक म्हणाले आहेत की, “मी आधीच सांगितले होते की, हिंदुस्थानचा बलुचिस्तानमध्ये रक्तरंजित खेळ सुरू राहिला तर, आम्ही लाल किल्ल्यापासून कश्मीरच्या जंगलांपर्यंत हिंदुस्थानवर हल्ला करू. काही दिवसांनी आमच्या सैनिकांनी घुसून हल्ला केला आणि त्यांनी इतक्या जोरदार प्रहार केला की मृतांचा आकडा अगणित आहे.”

दरम्यान, १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर अन्वर-उल-हक यांनी हे वक्तव्य केले आहे. ज्यामध्ये १५ लोकांचा मृत्यू झाला होता. कश्मीरच्या जंगलांबद्दलचे त्यांचे वक्तव्य पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात असल्याचे बोलले जात आहे.

Comments are closed.