IPL 2026 ऑक्शनपूर्वी CSK कर्णधार ऋतुराज गायकवाडची शानदार कामगिरी! पुनरागमनासाठी ठोकला जोरदार दावा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारताची ज्युनियर टीम 3 वनडे सामन्यांची मालिका खेळत होती. या मालिकेत इंडिया ‘A’ संघाने 2-1 ने विजय मिळवला. या मालिकेत ऋतुराज गायकवाडने (Ruturaj gaikwad) धावांची जबरदस्त आतषबाजी करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
टीम इंडियामध्ये (Team india) पुनरागमन करण्यासाठी ऋतुराज गायकवाड आपला दावा अधिक मजबूत करत आहे. मात्र, हा फॉर्म पुढेही कायम ठेवणे त्याच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
दक्षिण आफ्रिका ‘A’ विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ऋतुराज गायकवाडने नाबाद शतक ठोकले आणि त्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले आणि पुन्हा प्लेयर ऑफ द मॅच ठरला. मात्र तिसऱ्या सामन्यात तो फक्त 25 धावा करू शकला आणि टीमला पराभव पत्करावा लागला.
या मालिकेत गायकवाडने एकूण 3 सामने खेळले आणि तब्बल 210 धावा केल्या. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीकडे पाहता, त्याला लवकरच पुन्हा टीम इंडियात परतण्याची संधी मिळू शकते.
Comments are closed.