Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
सातत्याने पराभूत होऊनही विरोधी नेते आत्मपरीक्षण करायला तयार नाहीत .. कधी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला म्हणतात तर कधी मत चोरी झाली म्हणतात .. खरंतर घोटाळा यांच्या मेंदूत झाला आहे आणि चोरी यांच्या मेंदूची झाली आहे अशी टोलेबाजी करत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवेढा नगरपालिका प्रचाराचा नारळ फोडला. आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढ्यातून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी विराट रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले. सुरुवातीला नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून सर्व नेते सभास्थानी पोहोचले. वेळी नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार सुप्रिया जगताप यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला आज शहीद झालेले मंगळवेढ्याचे सुपुत्र बाळासाहेब पांढरे यांना श्रद्धांजली वाहून सभेची सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तुफानी टोलेबाजी करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सध्या विरोधकही खाजगीत सांगतात अगदी उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार जे असत आता भाजप 15 .. 20 वर्ष काही हालत नाही .. आता तर बिहार निवडणुका नंतर नगरपालिकेच्या निवडणुका राज्यात लागल्या आहेत .. याचा निकालानंतर महाराष्ट्रातले उरलेले नेतेही भाजप घ्या म्हणून मागे लागतील पण आपण एखाद दुसरा घेऊ असे म्हणत विरोधकांना चिमटा काढला. विरोधकांवर टोलेबाजी करताना सध्या कोण म्हणते मत चोरी करते .. कोण म्हणते ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे . हे सगळे गडी कन्फ्युज झालेले आहेत .. यांनाच कळेना काय होतंय .. हे कधी माणसातच नाहीत कधीच शेतीच्या प्रश्नावर कधी पाण्याच्या प्रश्नावर विजेच्या प्रश्नावर बोलताना दिसत नाहीत .. हे बोलतात ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे .. खरे तर यांच्या मेंदूतच घोटाळा आहे .. कोण म्हणते मत चोरी करतात मला वाटते ह्यांचा मेंदूत चोरीला गेला आहे .. अशा शब्दात विरोधकांना गोरे यांनी टोले लगावले . लोकसभेला आम्हीही पराभूत झालो पण आम्ही ईव्हीएम घोटाळा म्हणलो नाही उलट आम्ही आत्मपरीक्षण केलं आपलं काय चुकतंय हे लोकात जाऊन समजून घेतले आणि भरपूर काम करून विधानसभा जिंकून दाखवली .. विरोधकांना सल्ला देताना तुम्हीही ईव्हीएम वगैरे सोडा आणि लोकांमध्ये जा , लोकांना विचारा , आपले काय चुकते ते तपासा आणि मग जनता तुमचा विचार करेल .. असे गोरे यांनी सांगितले .. पण असले विरोधक असल्याने चिंता करायचे कारण नाही कारण राहुल गांधी कधी सापडतच नाहीत .. उद्धव ठाकरे निवडणुकीपुरते बाहेर येतात इतर वेळा ऑनलाईनच असतात असे टोले लगावले. स्थानिक विरोधकांना सवाल करीत मत मते मागण्यापूर्वी तुम्ही नगरपालिकेला निधी मागण्यासाठी कोणाकडे जाणार आहात ते आधी सांगा आणि मग मत मागा अशी टीका केली. बाभळीच्या झाडाखाली कोणी जात नाही .. दगड हा आंब्याच्या झाडांनाच मारला जातो .. तिथे झाडाखाली सावलीही मिळते आणि खायला आंबाही मिळतो .. मात्र बाभळीच्या झाडाजवळ गेल्यावर काटेही टोचतात आणि ना सावली मिळते असे सांगत मंगळवेढ्यात भाजपची सत्ता मोठ्या मताधिक्याने आणण्याचे आवाहन जयकुमार गोरे यांनी केले.
Comments are closed.