शनिवारपासून पावरा खाद्यसंस्कृतीचा महोत्सव, ‘डोमखा’ चहा, फुलांचा जॅम आणि ‘हिता’ डोसा

दुर्गम, डोंगराळ भागात राहणाऱया आदिवासींची संस्कृती जवळून अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. येत्या 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेत वन आहार महोत्सव होणार आहे. या महोत्सवात नंदुरबार जिह्यातील पावरा समाजाच्या खाद्यसंस्कृतीचा आनंद घेता येणार आहे.
या महोत्सवात पावरा आदिवासींच्या विलक्षण आणि रुचकर पदार्थांची चव चाखायला मिळेल. त्या भागांत आढळणाऱया रानफुलांचा ‘डोमखा’ चहा, फुलांपासून बनवला गेलेला जॅम, रानभाज्या, डोशाशी साधर्म्य असलेला हिता हा प्रकार, त्यांच्या भाकऱया असे पदार्थ चाखायला मिळणार आहेत. याशिवाय ज्युरॅसिक पार्कमधील वाटावे असे लाथाडो हे फळ, विविध कंदमुळे, कणसं यांचाही आस्वाद घेता येणार आहे. पोष फाऊंडेशनच्या अमोघ सहजे यांच्या संकल्पनेतून आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, पंचमहाभूते फाऊंडेशन, दादर सांस्कृतिक मंच या संस्थाच्या सहकार्याने हा महोत्सव होईल.

Comments are closed.