मासिक पाळीची तारीख दरमहिन्याला बदलते? करा हे घरगुती उपाय

मासिक पाळी ही महिलांमध्ये दर महिन्याला होणारी एक प्रक्रिया आहे. दर महिन्यातील ‘ते’ पाच दिवस प्रत्येक महिलेला नकोसे असतात. कधी कधी या वेदनाही असह्य असतात. पण एखादे महिने पाळी पुढे मागे झाली की टेन्शनही येते. अनेक महिलांची तर दर महिन्याला मासिक पाळीची तारीख बदलते, जी तज्ज्ञांच्या मते योग्य नाही. असे झाल्याने शरीरात सिस्टस तयार होतात आणि हार्मान्स देखील असुंलित होतात. अशा स्थितीत मासिक पाळी नियमित करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. याशिवाय मासिक पाळी नियमित करण्यासाठी घरगुती उपाय देखील करता येतील. आज आपण मासिक पाळी नियमित नसण्याची कारणे आणि उपाय जाणून घेऊयात.

अनियमित मासिक पाळीची कारणे –

  • तणाव हे अनियमित मासिक पाळीचे कारण आहे. महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन्स, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन संतुलन बिघडल्यावर मासिक पाणीचे चक्र बिघडते.
  • लठ्ठपणामुळे महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी सारख्या समस्या निर्माण होतात.

हेही वाचा – Milk Food Combinations: दुधासोबत खाऊ नयेत ‘हे’ पदार्थ

  • अनेक महिला डॉक्टरांचा सल्ला न घेता गर्भनिरोधक गोळ्या घेतात. यामुळे देखील मासिक पाळी अनियमित होऊ शकते.
  • थायरॉईडची समस्या वाढल्यावर मासिक पाळी अनियमित होऊ शकते.
  • शरीरात पाण्याची कमतरता असेल तर मासिक पाळीत अनियमितता जाणवू शकते.

उपाय –

  • दालचिनी शरीरात उष्णता निर्माण करते. यातील गुणधर्म मासिक पाळीच्या इन्सुलिनची पातळी राखतात. त्यामुळे दालचिनी कोमट दुधात किंवा चहामध्ये टाकून पिऊ शकता.
  • ओवा अनियमित मासिक पाळीचे चक्र सुरळीत करण्यासाठी उत्तम उपाय आहे. यासाठी ओव्याची काही पाने ग्लासभर पाण्यात उकळनून प्यावे.
  • तीळ उष्ण आहेत. त्यामुळे मासिक पाळी नियमित करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो.
  • कच्ची पपई गर्भाशयात आकुंचन उत्तेजित करते आणि मासिक पाळी येण्यास मदत करते. ज्यामुळे मासिक पाळी लवकर येते. तुम्ही दिवसातून दोनदा कच्ची पपई खाऊ शकता.
  • नियमितपणे रिकाम्यापोटी बडीशेपचे सेवन केल्याने मासिक पाळी नियमित होते. यासाठी ग्लासभर पाण्यात चमचाभर बडीशेप मिसळावी आणि हे पाणी सकाळी गाळून प्यावे.

(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

हेही वाचा – हिवाळ्यात सांधेदुखी : ए? काला हे रुतीं अनुसरण करा

Comments are closed.