एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे फडणवीस अन् चव्हाणांची तक्रार; उद्धव ठाकरेंचंही घेतलं नाव, दिल्लीत


मराठी Meets Amit Shah: शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (मराठी) यांनी काल (19 नोव्हेंबर) केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यापुढे तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती समोर येत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी अमित शाहांची भेट (मराठी Meets Amit Shah) घेत तासभर चर्चा केली. या भेटीत शिंदेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची (Ravindra Chavan) तक्रार केल्याचं कळतंय. तसंच उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीवर घेतल्यावरूनही एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. आपलीच मूळ शिवसेना असताना उद्धव ठाकरेंना समितीवर घेण्याची गरज काय? असं एकनाथ शिंदेंचं म्हणणं असल्याचं सांगण्यात येतंय. कल्याण डोंबिवलीसह अनेक भागात भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं. तसंच भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अनेक माजी नगरसेवक फोडले. भाजपच्या याच कृत्यावरुन एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. माझं या सगळ्यावर लक्ष आहे, असं अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना सांगितले.

एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे कोनाट्या टाकरी केला? (एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची तक्रार केली)

  1. कल्याण डोंबिवलीतील ‘ऑपरेशन लोटस’वरुन अमित शाहांसमोर नाराजी व्यक्त
  2. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष मात्र शिवसेनेचे नगरसेवक फोडतात.
  3. मोठी रक्कम देऊन रवींद्र चव्हाण नगरसेवक फोडतात.
  4. शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी कल्याणमध्ये रवींद्र चव्हाण सक्रिय आहेत.
  5. भाजप प्रदेशाध्यक्षांनी महायुतीलासोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे.
  6. आपलीच मूळ शिवसेना असताना उद्धव ठाकरेंना समितीवर घेण्याची गरज काय?

अमित शाह यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले? (मराठी Meets Amit Shah)

अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बिहार निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन करावे म्हणून मी अमित शाहांना भेटलो. तसेच, मी तक्रारीचा पाढा वाचणारा नसून मी रडणारा नाही तर लढणारा आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यातील छोटे-मोटे वाद आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसते, अशी प्रतिक्रिया राज्यातील महायुतीच्या वादावर एकनाथ शिंदेंनी दिली. तसेच, मी आतमध्ये बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सूरु आहेत, तुम्ही पतंग उडवता. महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे, हा राज्यातला विषय होता. हा विषय दिल्लीत नव्हताचं, असेही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.

भेटीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?, VIDEO:

संबंधित बातमी:

दिल्लीत अमित शाहांची भेट; बैठकीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी रडणारा नाही लढणारा, वादावरही स्पष्टच सांगितलं

आणखी वाचा

Comments are closed.