पहिल्या कसोटीत मिचेल स्टार्कला मोठी संधी; या विक्रमात रविचंद्रन अश्विनला मागे टाकण्याची शक्यता
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना 21 नोव्हेंबर रोजी पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यावेळी अॅशेस मालिका ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. अॅशेस कसोटी मालिकेतील या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला रवी अश्विनला एका खास यादीत मागे टाकण्याची संधी असेल. या वेगवान गोलंदाजाचा कसोटी स्वरूपात एक मजबूत विक्रम आहे. त्याने आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 191 बळी घेतले आहेत.
रवी अश्विन सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. माजी भारतीय खेळाडूने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 41 सामन्यांमध्ये 195 बळी घेतले. 191 बळींसह स्टार्क यादीत चौथ्या स्थानावर आहे. जर स्टार्कने आगामी कसोटी सामन्यात पाच बळी घेतले तर तो जागतिक कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर पोहोचू शकतो. या यादीत ऑस्ट्रेलियाचा नाथन लायन अव्वल स्थानावर आहे, ज्याने 3 5सामन्यांमध्ये 219 बळी घेतले आहेत. पॅट कमिन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने 51 सामन्यात 215 बळी घेतले आहेत.
मिशेल स्टार्कच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, कसोटी स्वरूपातील त्याचे आकडे खूपच प्रभावी आहेत. स्टार्कने आतापर्यंत 100 कसोटी सामने खेळले आहेत, 192 डावात त्याने 27.02 च्या सरासरीने 402 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याने 16 वेळा पाच बळी घेतले आहेत आणि दोन वेळा दहा बळीही घेतले आहेत. स्टार्क हा ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चौथा आहे.
ऑस्ट्रेलियाने पर्थमधील पहिल्या कसोटीसाठी आपला संघ आधीच जाहीर केला होता. संघाचे दोन स्टार खेळाडू, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड दुखापतीमुळे खेळणार नाहीत. कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करेल. इंग्लंडनेही पहिल्या कसोटीसाठी 12 जणांचा संघ जाहीर केला आहे.
Comments are closed.