माझं आजारपण कॅन्सरपर्यंत गेलंय, फडणवीस साहेबांनी याचा विचार करायला हवा होता; फोडाफोडीवरुन शहाजी
सांगोला: लोकसभेला मृत्यूच्या दारात असताना मी भाजपच्या उमेदवाराला 15 हजाराचे मताधिक्य दिले. याच फळ म्हणून मला सांगोल्यात एकटे पाडले का? सांगोल्यात काय चाललंय हे मुख्यमंत्र्यांना समजत नाही का? हेच माझे दुःख आहे अशा भावना सांगोल्याचे शिवसनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी व्यक्त केल्या आहेत. सांगोला नगरपालिका निवडणुकीत सुरू असलेल्या शिवसेना भाजप कलगीतुऱ्याचा या टप्प्यात सुरुवातीला आक्रमक झालेल्या शहाजी बापूंनी इमोशनल कार्ड बाहेर काढले. सांगोला नगरपालिका निवडणुकीत भाजपने बापूंचे कट्टर विरोधक असणाऱ्या शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांच्याशी आघाडी करत बापूंना (Shahajibapu Patil) एकटे पाडलं आहे. यावर सुरुवातीला शहाजी बापूंनी भाजपला थेट हीडिस, किळसवाणे राजकारण असल्याची गंभीर टीका केली होती. याला काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट प्रतिउत्तर देत पाच वर्षात एवढा पैसा येऊनही विकास का दिसत नाही असा सवाल करीत कोणाचे राजकारण करण्यासाठी किंवा अस्तित्व टिकवण्यासाठी ही निवडणूक नसल्याचा टोला लगावला होता. आधी त्यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार बापूंनी (Shahajibapu Patil) जाहीर केला आणि मग युतीबाबत चर्चेचा कांगावा केला असल्याचा ठपकाही जयकुमार गोरे यांनी ठेवला होता.
आता शहाजीबापू पाटील हे दोन पावले मागे सरकत त्यांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत व्यक्त केली आहे. सांगोल्यात जे चालू होते ते मुख्यमंत्र्यांना समजत नव्हते का? असा सवाल करीत लोकसभा निवडणुकीत माझे आजारपण मी अंगावर काढल्याने ते कॅन्सर पर्यंत गेले. लोकसभा निवडणूक सोडून जर मी उपचार घेतले असते, तर माझा आजार असा बिकट कॅन्सरपर्यंत गेला नसता. मात्र आपली जबाबदारी ओळखून मी उपचार घेणे टाळत लोकसभेचा प्रचार केला आणि भाजपला 15000 मतांचे लीड मिळवून दिले.
लोकसभा निवडणूक काळात तीन महिने मी साधा आजार लांबवला आणि आज साधा आजार गंभीर बनला असल्याचेही बापूंनी यावेळी सांगितले. असे असताना सांगोल्यात मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आक्षेप त्यांचा असून ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या-त्याच्या सोबत असे म्हणत बापूंनी भाजपच्या धोरणावर सडकून टीका केली असल्याने आपण डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि भाजप उमेदवार रणजीत निंबाळकर यांना 15000 चे लीड मिळवून दिले. यामुळे माझे डॉक्टरही माझ्यावर नाराज झाले आणि माझा आजार वेळीच उपचार न झाल्याने गंभीरपणाकडे गेला असा ठपकाही शहाजीबापू पाटील यांनी ठेवला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.