सेमीफायनलमध्ये भारत बांगलादेशविरुद्ध अन् पाकिस्तान श्रीलंकेविरुद्ध भिडणार; वैभव सूर्यवंशीकडे लक


आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 उपांत्य फेरीचे वेळापत्रक: आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 ची स्पर्धा बादफेरी टप्प्यात पोहोचली आहे. तीन लीग सामन्यांनंतर, उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये भारत अ, पाकिस्तान अ, श्रीलंका अ आणि बांगलादेश अ संघाचा समावेश आहे. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 21 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिल्या उपांत्यफेरीचा सामना होईल. तर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात  दुसरा उपांत्यफेरीचा सामना रंगेल.

गट अ मधून बांगलादेश आणि श्रीलंका उपांत्य फेरीसाठी पात्र- (Sri Lanka vs Bangladesh)

गट अ मध्ये, बांगलादेश अ आणि श्रीलंका अ संघांनी उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली. बांगलादेशने तीन पैकी दोन सामने जिंकले, चार गुण मिळवले आणि नेट रन रेटच्या आधारे आगेकूच केली. दुसरीकडे, श्रीलंकेने जोरदार कामगिरी केली, तीन पैकी दोन सामने जिंकले आणि गटात अव्वल स्थान पटकावले. अफगाणिस्तान अ संघाने बांगलादेश आणि श्रीलंकेसोबत समान गुणांसह गट अ मध्ये स्थान मिळवले होते, परंतु खराब नेट रन रेटमुळे उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले. हाँगकाँगने त्यांचे तिनही सामने गमावले.

गट ब मधून भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र- (India vs Pakistan)

पाकिस्तान अ संघाने ब गटात दमदार कामगिरी केली, पाकिस्तानने तिनही सामने जिंकून थेट उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. पाकिस्तानने 6 गुणांसह गटात पहिले स्थान पटकावले. भारत अ संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले आणि 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहून अंतिम चारमध्ये प्रवेश केला. ओमानने एक सामना जिंकला. तर युएईला एकही सामना जिंकता आला नाही.

उपांत्य फेरीचे वेळापत्रक- (Asia Cup Rising Stars 2025 Semi Final Schedule)

पहिला उपांत्य सामना: भारत अ विरुद्ध बांगलादेश अ, दुपारी 3 वाजता

दुसरा उपांत्य सामना: पाकिस्तान अ विरुद्ध श्रीलंका अ, रात्री 8 वाजता

अंतिम सामना- 23 नोव्हेंबर

भारताचा आतापर्यंतचा स्पर्धेतील प्रवास- (Vaibhav Suryavanshi India)

भारत अ संघाने स्पर्धेची धमाकेदार सुरुवात केली. पहिल्या सामन्यात त्यांनी युएईला 148 धावांनी हरवून दमदार सुरुवात केली. तथापि, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान अ संघाने 8 विकेट्सने पराभव करून भारताला मोठा धक्का दिला. तरीही, शेवटच्या साखळी सामन्यात ओमानला 6 विकेट्सने हरवून संघाने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताकडून आता दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि श्रीलंका देखील जेतेपदाकडे वाटचाल करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्यास सज्ज आहेत.

संबंधित बातमी:

Vaibhav Suryavanshi Record : वैभव सूर्यवंशीचं नाव ऐकूनच ओमानच्या टीमला घाम फुटला; एकच मोठा शॉट अन् महारिकॉर्ड रचण्याची संधी; होणार जगातील पहिला फलंदाज

आणखी वाचा

Comments are closed.