एबी फॉर्म चोरल्याचा आरोप, ठाकरेंकडून उमेदवारांची हकालपट्टी; भर पत्रकार परिषदेत शिवसैनिक ढसाढसा


अहिल्यानगर वार्ता: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (Shiv Sena UBT) पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत राहाता नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे (Rajendra Pathare), माजी नगरसेवक सागर लुटे (Sagar Lute) आणि नगरसेविका उज्ज्वला होले (Ujjwala Holay) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या निर्णयामुळे राहाता–शिर्डी परिसरातील शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली असून, भरत पत्रकार परिषदेत निष्ठावान शिवसैनिकांना अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले आहे. शिवसैनिकांनी काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र पठारे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते, तर सागर लुटे आणि उज्ज्वला होले या नगरसेवकपदासाठी उमेदवार म्हणून इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीत सामील न होता तसेच पक्षाचा एबी फॉर्म भरल्याने या तिघांवर कारवाई करण्यात आली. एबी फॉर्म “चोरल्याचा” आरोप पक्षाचे नेते अनिल देसाई यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.

अहिल्यानगर न्यूज : ना ठाकरे सेना ना के.टी.सेना

या पार्श्वभूमीवर राहाता–शिर्डी तालुक्यात पक्षातील अंतर्गत तणाव तीव्र झाला आहे. ठाकरे सेनेत बाळासाहेब थोरात यांचा मोठा हस्तक्षेप असल्याचा आरोप नाराज शिवसैनिकांकडून करण्यात आला. पत्रकार परिषदेत राजेंद्र पठारे यांनी थोरातांवर घणाघाती टीका करत म्हटले की, “ही ठाकरे सेना नाही, तर KT सेना (कोल्हे – थोरात सेना) असल्यचे त्यांनी म्हटले आहे.

Ahilyanagar News: जिल्ह्यातील ठाकरे सेना संपवण्याचा थोरातांचा डाव

गेल्या 30 वर्षांपासून निष्ठापूर्वक पक्षात कार्यरत असलेले राजेंद्र पठारे यांनी जिल्हा उपप्रमुखासह अनेक पदांवर काम केले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, “विखे समर्थकांनी माझे घर जाळले, आंदोलनात अनेक केसेस अंगावर घेतल्या, पण पक्ष कधीच सोडला नाही. निष्ठावान शिवसैनिकांना असा न्याय मिळत असेल तर ते अयोग्य आहे, असा भावना देखील राजेंद्र पठारे यांनी व्यक्त केल्या. तसेच, जिल्ह्यातील ठाकरे सेना संपवण्याचा थोरातांचा डाव असल्याचा थेट आरोप देखील पठारे यांनी केला आहे. यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता राजेंद्र पठारे यांच्या आरोपांवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

बाळासाहेब थोरातांच्या शहरातच पंजा चिन्ह गायब, नगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र आघाडी, सत्यजित तांबेंची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

Sangamner Election 2025: संगमनेरमध्ये आमदार पत्नी विरुद्ध आमदाराची भावजयी रिंगणात; सत्यजित तांबे, अमोल खताळांची प्रतिष्ठा पणाला; बाळासाहेब थोरातांच्या भगिनीही मैदानात

आणखी वाचा

Comments are closed.