युती आघाडीतून वेळ मिळाल्यास इकडे ही बघा पालकमंत्री…, अंबादास दानवे यांनी केली टीका

मुंबईत वांद्रे किल्ल्यावरील दारू पार्टीची घटना ताजी असतानाच आता रत्नागिरीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत किल्ल्यावर बाटल्यांचा खच पडलेला दिसत आहे. शिवसेना नेते, अंबादास दानवे यांनी हा फोटो त्यांच्या ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

रत्नागिरी सुवर्णदुर्गावरील कचऱ्याचा फोटो एक्सवर शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. नेत्यांना खुश करण्यासाठी किल्ल्याखाली राजकीय दुकानं थाटण्यापेक्षा हे किल्ले कचरामुक्त केले तर राज्याची, देशाची प्रतिमा जरा बरी होईल, असा जबरदस्त टोला सामंत यांना लगावला आहे.

अंबादास दानवे एक्स पोस्टवर रत्नागिरीतील सुवर्णदुर्गावर पडलेल्या कचऱ्याचे फोटोच्या माध्यमातून वास्तव दाखवले आहे. हा फोटो त्यांनी एक्सवर शेअर केला आहे. त्यावर ते म्हणाले की, हा आहे रत्नागिरीतील सुवर्णदुर्गावरील कचऱ्याचा फोटो. पडलेल्या बाटल्या नीट पाहिल्यावर किल्ल्यावर ओल्या पार्ट्या चालतात हे कळेलच. नेत्यांना खुश करण्यासाठी किल्ल्याखाली राजकीय दुकानं थाटण्यापेक्षा हे किल्ले कचरामुक्त केले तर राज्याची, देशाची प्रतिमा जरा बारी होईल. विद्यमान पर्यटन मंत्री राज्याचे नाहीत तर फक्त साताऱ्याचेच आहेत. युती आघाडीतून वेळ मिळाल्यास इकडे ही बघा पालकमंत्री @samant_uday असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

Comments are closed.