CM नितीश कुमारांपेक्षा 30 पट जास्त संपत्ती, कोण आहेत मंत्री रमा निषाद, बिहारमधील भाजपचा चेहरा?
नवी दिल्ली : बिहार विधानसभा (बिहार) निवडणुकीत भाजप एनडीए आघाडीला मोठ बहुमत मिळालं असून 243 पैकी 203 जागा जिंकत एनडीने सरकार स्थापन केलं. बिहारच्या मुख्यमंत्रीपदा पुन्हा एकदा नितीश कुमार यांनाच संधी मिळाली असून आपल्या राजकीय कारकिर्दीत 10 व्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्यासह दोन उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचाही शपथविधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यामध्ये, रमा निषद यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. रामा निषाद (भाजप) यांची संपत्ती मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापेक्षा 30 पटीने जास्त असल्याने त्या बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. तसेच, बिहारमधील गर्भश्रीमंत मंत्री म्हणूनही त्यांचा नामोल्लेख होत आहे.
रमा निषाद मुजफ्फरपूरच्या औराई मतदारसंघातून आमदार बनल्या आहेत. निवडणूक अर्ज दाखल करताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती 31.86 कोटी एवढी आहे. त्यामध्ये, चल संपत्ती 6 कोटी 5 लाख रुपये एवढी असून अचल संपत्ती 25 कोटी 8 लाख रुपये आहे. त्यांच्यावर 75 लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे. दरम्यान, रमा निषाद यांची संपत्ती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यापेक्षा 30 पट जास्त असल्याचे समजते. कारण, निवडणूक विवरण पत्रातील माहितीनुसार, नितीश कुमार यांची एकूण संपत्ती 1 कोटी 64 लाख रुपये आहे. नितीश कुमार यांच्याकडे काही रक्कम रोख स्वरुपात असून बाकी बँकेत जमा आहे. तर, संपत्तीमधील बहुतांश वाटा अचल असल्याची माहिती आहे.
रमा निषाद गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय व सामाजिक जीवन सक्रीय असून त्या 58 वर्षांच्या आहेत. रमा यांचे पती अजय निषाद हे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. सन 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी मुजफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. दोन्ही निषाद पती-पत्नी राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रीय आहेत. त्यामुळेच, मतदारसंघात त्यांची जनसामान्यांना ओळख आहे. निषाद कुटुंबात तीन अपत्ये असून दोन मुली आणि एक मुलगा आहे. रमा निषाद ह्या भाजपच्या प्रमुख नेत्या असून बिहारच्या राजकारणात त्यांचं वरिष्ठ स्थान आहे. आपल्या राजकीय जीवनातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, रमा निषाद यांच्यावर 2 गुन्हेगारी खटले दाखल आहेत.
बिहारमधील गर्भश्रीमंत मंत्री
बिहारच्या नवीन मंत्रिमंडळातील सदस्यांपैकी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री विजय सिन्हा हे गर्भश्रीमंत आहेत. विजय सिन्हा यांची संपत्ती 11.62 कोटी एवढी आहे. तर, सम्राट चौधरी यांची संपत्ती 11.34 कोटी रुपये आहे.
बिहारमधील मंत्र्यांची यादी
सम्राट चौधरी
विजयकुमार सिन्हा
विजयकुमार चौधरी
बिजेंद्र प्रसाद यादव
श्रावणकुमार
मंगल पांडे
डॉ दिलीप जैस्वाल
अशोक चौधरी
लेसी सिंग
मदन सहानी
नितीन नवीन
रामकृपाल यादव
संतोषकुमार सुमन
सुनील कुमार
Mo. ठेव खाण
संजय सिंग वाघ
अरुण शंकर प्रसाद
सुरेंद्र मेहता
नारायण प्रसाद
रमा निषाद
लखेंद्र कुमार रोशन
श्रेयसी सिंग
प्रमोद कुमार यांनी डॉ
संजय कुमार
संजयकुमार सिंग
दिवा प्रकाश
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.