Margashirsha 2025 : यंदा मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार? वाचा एका क्लिकवर

हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना पवित्र मानला जातो. हा महिना दानधर्म आणि परोपकारासाठी अत्यंत शुभ असतो. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना आहे. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत महिला करतात. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते. यासोबत ऐश्वर्य, यश आणि समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे महिला आवर्जून दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रुपाची पूजा करतात. त्यामुळे यंदा मार्गशीर्षमध्ये किती गुरुवार आहेत? शेवटचा गुरूवार कधी असणार आहे? घट कसे मांडायचा? याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात.

मार्गशीर्ष कधीपासून?

कार्तिक अमावस्या तिथी बुधवारी 19 नोव्हेंबर रोजी सकाळी सुरू झाली असून आज गुरुवारी 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजून 16 मिनिटांनी संपली आहे. त्यामुळे अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते असे सांगितले जाते. 2025 मधील मार्गशीर्ष महिना शुक्रवार 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरु होत आहे.

हेही वाचा – मार्गशीर्ष अमावस्या 19 की 20 नोव्हेंबरला? जाणून घ्या योग्य तारीख

मार्गशीर्ष गुरुवार तारखा –

  • पहिला गुरुवार – 27 नोव्हेंबर
  • दुसरा गुरुवार – 4 डिसेंबर
  • तिसरा गुरुवार – 11 डिसेंबर
  • चौथा गुरुवार – 18 डिसेंबर

घट मांडण्याची पद्धत –

  • जेथे घट मांडणार आहात तेथील जागा स्वच्छ करून घ्या.
  • सुंदर रांगोळी काढा.
  • रांगोळीवर चौंरग किंवा पाट मांडावा.
  • पाटावर लाल कापड ठेवून त्यावर तांदूळ आणि तांब्याचा कलश ठेवावा.
  • कलशाला हळद-कुंकू लावून त्यात पाणी, अक्षता, दूर्वा, रुपयाचं नाणं आणि सुपारी घालावी.
  • विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी कलशावर ठेवा आणि त्यावर नारळ ठेवावा.
  • श्री लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे.
  • कलशापुढे विडा, खोबरे, बदाम आणि इतर फळे ठेवावीत.
  • मार्गशीर्ष पोथीचे पठण करावे आणि नैवेद्य दाखवावा.

(टिप – सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)

हेही वाचा – Kanyadaan: आई वडील नसतील तर मुलीचे कन्यादान कोणी करावे?

Comments are closed.