पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, तयारीला वेग, निवडणूक आयोगानं दिलं


Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Muncipal Corporation Election 2025) तयारीला वेग आला आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विधानसभा मतदारसंघांची प्रभागनिहाय विभागणी करून तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज अधिकृतरीत्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांना आपल्या नावांबाबत हरकती किंवा सूचना नोंदवण्यासाठी  20 ते 27  नोव्हेंबर 2025 हा कालावधी देण्यात आला असून, या संदर्भातील सुविधा संपूर्ण शहरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

हे  प्रारूप मतदार याद्या प्रभागनिहाय माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रति पृष्ठ रु. 2/- याप्रमाणे सावित्रीबाई फुले सभागृह येथे विक्रीस उपलब्ध आहेत, अशी माहिती देखील निवडणूक विभागातून देण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे वेळापत्रक

20 नोव्हेंबर 2025: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

20 – 27 नोव्हेंबर 2025: हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी

5 डिसेंबर 2025: हरकतींवरील निर्णय व प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध

8 डिसेंबर 2025: मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी जाहीर

12  डिसेंबर 2025: मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध

प्रारूप मतदार यादी ही आगामी निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. शहरातील प्रत्येक मतदाराने स्वतःचे नाव योग्यरित्या नोंदले आहे का, याची खात्री करून आवश्यक असल्यास हरकती व सूचना वेळेत दाखल करणे अत्यावश्यक आहे. प्रारूप मतदार यादीवर येणाऱ्या हरकती व सूचनांवर निवडणूक आयोगाच्या नियमान्वये कार्यवाही करण्यात येईल. असे  पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त  विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या तयारीला वेग

दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच पातळ्यांवर तयारी सुरू केली आहे.  पक्षातील स्थानिक नेत्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीमकडून प्रभाग निहाय सर्वे केला जात आहे. उमेदवारी प्रक्रियेला राष्ट्रवादीने गती दिली असून 25 नोव्हेंबर पर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. बहुतांश प्रभागांमध्ये दोन ते तीन उमेदवार पुढे आल्याची माहितीही आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते माधव पाटील यांनी वर्ल्ड बँकेकडे कर्जाची मागणी केली असून प्रभाग क्रमांक 17 मधील 30000 महिलांना प्रत्येकी दहा हजार एक रुपयांचा वाटप करण्यासाठी हे कर्ज हवं असल्याचं समोर आलं आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे कारण पुढे करत त्यांनी हे कर्ज मागितल्याने त्याची चर्चा रंगली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.