गौतम गंभीर आणि टीम इंडियाच्या फलंदाजी कोचमध्ये तणाव! कोलकाता पिचवर घमासान; दिलं मोठं विधान
गौतम गंभीर आणि भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांच्या विधानांवरून बरेच मतभेद दिसून येत आहेत. तीन दिवसांपेक्षा कमी काळ चाललेल्या कोलकाता कसोटीत भारताचा 30 धावांनी पराभव झाला. गंभीरने पिच क्युरेटरच्या समर्थनार्थ मैदानात उतरून म्हटले होते की टीम इंडियाने अशा खेळपट्टीची विनंती केली होती. तथापि, सीतांशू कोटक यांनी पराभवासाठी ईडन गार्डन्सच्या खेळपट्टी क्युरेटरला जबाबदार धरले आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीपूर्वी सीतांशू कोटक म्हणाले, “लोक गौतम गंभीर-गौतम गंभीर म्हणत आहेत. मी स्वतः सपोर्ट स्टाफचा सदस्य आहे आणि मला हे ऐकून वाईट वाटते. ही टीका करण्याची पद्धत नाही. काही जण स्वतःचा अजेंडा पुढे करण्यासाठी अशा गोष्टी बोलत असतील. त्यांना शुभेच्छा, पण हे चुकीचे आहे.”
सीतांशू कोटक म्हणाले की अशी खेळपट्टी कोणालाही नको होती. मागील सामन्यात (कोलकाता) खेळपट्टीची सर्व जबाबदारी गौतम गंभीरने घेतली होती. तो म्हणाला, “गौतम गंभीर यांनी पिचची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली कारण त्यांना वाटत होते की सर्व दोष क्यूरेटरवर टाकता येत नाही. दुसऱ्या दिवशीपासूनच पिचचे रूप बदलू लागले. चेंडू पडताच माती उडत होती, हे सर्वांसमोर दिसत होतं. अशी परिस्थिती कुणीच अपेक्षित केली नव्हती.”
सितांशू कोटक पुढे म्हणाले, ““स्पिनची अपेक्षा नक्कीच होती, पण ती तिसऱ्या दिवशीच्या सत्रानंतर दिसेल अशी आमची कल्पना होती. हवामान किंवा क्यूरेटर , कोणीही अशा प्रकारची पिच इच्छित नव्हते. मी प्रामाणिकपणे सांगतो, अशी पिच कुणालाच नको होती.”
भारतीय संघाच्या टीकेचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांना त्यांच्या घरच्या मैदानावर 124 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. या लक्ष्याचा पाठलाग करताना, टीम इंडिया 93 धावांवर ऑलआउट झाली.
Comments are closed.