“तू चालत राहा!” रिंकू राजगुरूच्या 'आशा'चा टीझर रिलीज, आर्चीला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक

- रिंकू राजगुरू नवीन चित्रपट
- 'आशा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
- दिग्दर्शन दीपक पाटील यांनी केले
मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट प्रदर्शित होतात. काही चित्रपट आपल्याला प्रेरणा देतात. अशाच एका चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट आहे 'आशा'. या चित्रपटात रिंकू राजगुरू एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
'बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये' अशी दमदार टॅगलाईन असलेला 'आशा' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
'आशा'ने प्रदर्शनापूर्वीच आपली ताकद दाखवून दिली आहे. या चित्रपटाने 61 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पारितोषिके जिंकली आणि समीक्षकांची वाहवा मिळवली, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
'निर्धार'चा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली, जाणून घ्या चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
या चित्रपटात महिलांची जिद्द, त्यांचा संघर्ष, आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या हृदयस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. कथानकाच्या केंद्रस्थानी असलेल्या 'आशा सेविका'ची भूमिका रिंकू राजगुरू साकारत आहे. तिच्यासोबत अभिनेता सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दंडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
रिंकूची 'आशा' ही केवळ आरोग्य सेविका नसून प्रत्येक स्त्रीसाठी आधार, मार्गदर्शक आणि निर्भीड आवाज आहे. तिच्या डोळ्यांतून अनुभवता येणारा संघर्ष आणि परिस्थितीला तोंड देताना तिची ठाम भूमिका हा चित्रपटाचा प्रमुख आधारस्तंभ असेल.
वीकेंड जड जाईल! द फॅमिली मॅन 3 सह ओटीटीवर 7 ब्लॉकबस्टर मालिका-चित्रपट; संपूर्ण यादी पहा
दिग्दर्शक दीपक पाटील म्हणतात, “'आशा' हा केवळ आशा सेवकांबद्दलचा चित्रपट नाही, तर घराची काळजी घेण्यासाठी आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक स्त्रीची कथा आहे. नवनवीन विषयांसाठी नेहमी मोकळेपणाने विचार करणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ही आगळीवेगळी आणि संवेदनशील कथा नक्कीच आवडेल.”
'आशा'ची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, नीलेश कुवर, दैवता पाटील आणि दीपक पाटील यांनी केली असून सहनिर्माते म्हणून मुरलीधर चटवानी आणि रवींद्र आवटी आहेत. पॅनोरमा स्टुडिओच्या माध्यमातून प्रदर्शित होणारा हा चित्रपट एका वेगळ्या कथानकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना नवे जग दाखवणार आहे.
Comments are closed.