नेपाळमध्ये ‘जेन झी’चा पुन्हा उद्रेक, हिंदुस्थान सीमेजवळ कर्फ्यू… देशांतर्गत उड्डाणे रद्द

नेपाळमध्ये पदच्युत झालेले माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ विरोधात ‘जेन-झी’ पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या सीमेवर असलेल्या बारा या जिह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच काठमांडू ते सिमरापर्यंत सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बुधवारी ओली यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि जेन-झी यांच्यात संघर्ष झाला होता. त्या वेळी आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला होता. मात्र आरोपींना अटक न झाल्याने आंदोलनाची ठिणगी पडली.

Comments are closed.