४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी म्हाडाच्या पुणे मंडळाचा आणखी एक मोठा निर्णय, आणखी एक मुदतवाढ, पाहा नवीन तारीख….

म्हाडा पुणे न्यूज : मुंबई पुणे ठाणे नागपूर कोल्हापूर सोलापूर सारख्या शहरात घर खरेदी करणे हे खूप आव्हानात्मक काम होत आहे. नागरिकांना आता आवडत्या ठिकाणी घर घ्यायचे असल्यास लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. मालमत्तेच्या किमती सतत गगनाला भिडत असल्याने, स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न अनेकांचे स्वप्नच राहिले आहे.
मात्र या महानगरांमध्ये म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून दिली जात आहेत. म्हाडाच्या घरांना सर्वसामान्यांचाही चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. दरम्यान, माडाच्या पुणे मंडळातर्फे सर्वसामान्यांसाठी हजारो घरांची लॉटरीही जाहीर करण्यात आली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए आणि सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांमध्ये उपलब्ध घरांसाठी ही लॉटरी जाहीर करण्यात आली असून आता या सोडतीबाबत नवीन अपडेट समोर आले आहे.
या 4,186 सदनिकांसाठी आयोजित संगणकीकृत लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून त्यामुळे सर्वसामान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन मुदतीनुसार, आता अर्जदार पुणे मंडळाच्या या लॉटरीसाठी ३० नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर 2025 होती. अर्थात, यावेळी मंडळांनी अंतिम मुदत दहा दिवसांनी वाढवली आहे.
यापूर्वीही मंडळांनी एकदा मुदत वाढवून दिली होती, आता पुन्हा एकदा मुदत वाढविण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु ही शेवटची मुदतवाढ असण्याची शक्यता आहे त्यामुळे इच्छुक अर्जदारांनी योग्य कागदपत्रांसह त्वरित अर्ज सादर करणे हिताचे ठरेल.
मंडळाकडून उपलब्ध माहितीनुसार, या योजनेसाठी आतापर्यंत १,८२,७८१ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १,३३,८८५ अर्जांची अनामत रक्कमेसह नोंदणी झाली आहे. दस्तऐवज पडताळणीदरम्यान अनेक अर्जदारांना येणारा प्रचंड प्रतिसाद आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडाने अर्जाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
अर्जदार 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ठेवीची रक्कम ऑनलाइन भरू शकतात. तर RTGS/NEFT द्वारे पैसे भरणाऱ्यांसाठी, संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत 1 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत आहे.
लॉटरी कधी आहे?
या सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीकृत लॉटरी 11 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता काढण्यात येणार आहे. नवीन वेळापत्रक म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जाहिरातीतील इतर सर्व अटी आणि तपशील पूर्वीप्रमाणेच लागू राहतील, असे पुणे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, कागदपत्र पडताळणीला होणारा विलंब आणि नागरिकांकडून मुदतवाढीची मागणी लक्षात घेऊन मंडळाने अर्ज भरण्याची मुदत वाढविल्याचे समजते.
Comments are closed.