अ‍ॅशेस कसोटी भारतात सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या सविस्तर

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस कसोटी मालिका शुक्रवार, 21 नोव्हेंबरपासून पर्थ स्टेडियममध्ये सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये इंग्लंडचे हालचाली नेहमीच निराशाजनक ठरल्या आहेत; मागील 15 कसोटीमध्ये इंग्लंडला 13 पराभव आणि 2 सामने ड्रा मिळाले आहेत. शेवटचा विजय इंग्लंडने 2010-11 मध्ये 3-1 ने मिळवला होता.

ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडू, कर्णधार पॅट कमिंस आणि वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड, दुखापतीमुळे पहिल्या कसोटीमध्ये खेळणार नाहीत. तरीही, चाहत्यांसाठी भरपूर रोमांचाची हमी आहे.

पहिला कसोटी सामना:
पहिला कसोटी 21-25 नोव्हेंबर 2025 दरम्यान पर्थ स्टेडियममध्ये होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7:50 वाजता सुरू होईल. टॉस स्टीव स्मिथ आणि बेन स्टोक्स यांच्या नेतृत्वाखाली अर्धा तास आधी होईल.

पहिला कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येईल. तसेच, जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर स्ट्रीमिंगची सोय उपलब्ध आहे.

सेशन वेळापत्रक:
पहिला सेशन: 7:50 – 9:50
लंच ब्रेक: 9:50 – 10:30
दुसरा सेशन: 10:30 – 12:30
चहाचा ब्रेक: 12:30 – 12:50
तिसरा सेशन: 12:50 – 14:50

अ‍ॅशेस सीरीज शेड्यूल:
पहिली कसोटी: 21-25 नोव्हेंबर (पर्थ)
दुसरी कसोटी: 4-8 डिसेंबर (ब्रिस्बेन, द गाबा)
तिसरी कसोटी : 17-21 डिसेंबर (एडिलेड ओवल)
चौथी कसोटी (बॉक्सिंग डे): 26-30 डिसेंबर (एमसीजी, मेलबर्न)
पाचवी कसोटी: 4-8 जानेवारी 2026 (एसीजी, सिडनी)

संघ आणि खेळाडू:
ऑस्ट्रेलिया: स्टीव स्मिथ (कर्णधर), जैक वेदराल्ड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, ट्रेविस हेड, कॅमरुन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लियोन, ब्रेंडन डोगेट, स्कॉट बोलांड.

इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्ंधर), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, ब्रायडन कार्स, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, मार्क वुड, शोएब बशीर.

Comments are closed.