पतीने त्याची सर्व मालमत्ता पत्नीला हस्तांतरित करावी.. संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेव यांनी न्यायालयाला काय सांगितले, वाचा

दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मृत्युपत्रावरील सुरू असलेल्या वादाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाची सुनावणी घेतली. संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया कपूर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, पतीने आपली सर्व मालमत्ता पत्नीला देणे ही असामान्य गोष्ट नाही, तर त्यांच्या कुटुंबात खोलवर रुजलेली एक मजबूत परंपरा आहे.
संजयच्या वडिलांनी त्यांची संपूर्ण मालमत्ता पत्नी राणी कपूरला दिली होती. प्रिया कपूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, संजयच्या वडिलांनीही त्यांच्या मृत्युपत्रात त्यांची संपूर्ण मालमत्ता त्यांची पत्नी राणी कपूर यांना दिली होती. त्याचप्रमाणे, संजय कपूरच्या मृत्युपत्रातही त्यांची पत्नी प्रियाचे नाव वारस म्हणून आहे, त्यामुळे यात काही शंका नाही.
मृत्यू अटळ आहे… वेळ आली होती हेच खरं, मधमाशी निमित्त ठरली; संजय कपूर गेला!
दिवंगत संजय कपूरची पहिली पत्नी करिश्मा कपूर यांची मुले समायरा कपूर आणि तिचा भाऊ यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, त्यांच्या वडिलांचे कथित मृत्युपत्र संशयास्पद परिस्थितीत समोर आले आहे आणि त्याची चौकशी केली पाहिजे. मुलांनी प्रिया कपूर यांना संजयची मालमत्ता विकण्यापासून किंवा हस्तांतरित करण्यापासून रोखण्यासाठी अंतरिम आदेश देण्याची मागणीही केली. प्रिया कपूर यांनी न्यायालयात सांगितले की मृत्युपत्राची प्रिंटआउट १० फेब्रुवारी २०२५ रोजी संजय कपूर यांना दाखवण्यात आली होती. त्यांनी काही बदल सुचवले, जे १७ मार्च २०२५ पर्यंत अंतिम करण्यात आले. वकिलाने स्पष्ट केले की संजय आणि प्रिया दोघांचेही मृत्युपत्र एकाच दिवशी तयार करण्यात आले होते, जसे की सामान्यतः पती-पत्नीमध्ये होते.
प्रिया कपूरच्या बाजूने दिल्ली उच्च न्यायालयात असा युक्तिवाद केला की हा कोणालाही वारसा वंचित करण्याचा खटला नाही, कारण करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांना आधीच एका कुटुंब ट्रस्टद्वारे अंदाजे २००० कोटी रुपये लाभ म्हणून वितरित केले गेले आहेत. १२ जून २०२५ रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान अचानक हृदयविकाराच्या झटक्याने संजय कपूर यांचे निधन झाले होते.

Comments are closed.