बाल हक्क संरक्षणासाठी NCPCR चा पुढाकार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
राष्ट्रीय बालअधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) मागील महिन्यात सुमारे 26 हजार प्रकरणे निकालात काढली असून देशभरातून 2,300 हून अधिक मुलांना वाचविले आहे. बाल अधिकारांचे उल्लंघन केवळ आकडे नसून प्रत्येक प्रकरण एक मूल आणि त्याच्या परिवाराची कहाणी दर्शवत असल्याचे एनसीपीसीआरच्या विशेष शाखेचे प्रमुख पारेश शाह यांनी सांगितले. अधिकाऱ्यांकडून प्रभावी कारवाई केवळ मुलांच्या जीवनाला नव्हे तर देशाच्या भविष्यालाही प्रभावित करते. केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येक मूलाच्या सुरक्षेसाठी प्रतिबद्ध आहे.
परंतु केवळ कठोर कायदा पुरेसा नाही. याकरता मजबूत देखरेख, जागरुकता आणि समन्वित अंमलबजावणीही आवश्यक असल्याचे उद्गार त्यांनी काढले.अरुणाचल प्रदेशात आयोजित राज्यस्तरीय संमेलनाला त्यांनी संबोधित पेले आहे. या संमेलनात प्रमुख बालअधिकार कायद्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटी आणि आव्हानांवर चर्चा करण्यात आली. मागील 6 महिन्यांमध्ये आयोगाने सुमारे 26 प्रकरणांना निकालात काढले आहे. तर 2300 हून अधिक मुलांना वाचविले आणि 1 हजारांहून अधिक मुलांना त्यांच्या मूळ गावी परत पोहोचविले आहे. यात एनसीपीसीआरकडून लागू करण्यात आलेल्या नव्या तंत्रज्ञान आधारित प्रणालीचेही योगदान असल्याचे शाह म्हणाले.
Comments are closed.