पुण्यात पवार काका-पुतणे एकत्र; लोणावळ्यात शरद पवारांच्या पक्षाचा अजित पवारांच्या गटाला बिनशर्त


लोणावळा : लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत एक मोठी आणि निर्णायक राजकीय घडामोड समोर आली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून लोणावळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने (NCP Sharad Pawar) बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे लोणावळ्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक १३ मध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलं आहे.

NCP: सुनील शेळकेंच्या प्रयत्नांमुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र

यामुळे लोणावळ्यात राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांनी एकत्र येत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. लोणावळ्यात मागील काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष दिसून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्रितपणे भाजपविरोधात रणनीती आखत असून शरद पवार गटाने दिलेला बिनशर्त पाठिंबा हा केवळ एक राजकीय निर्णय नसून लोणावळ्यात राष्ट्रवादीच्या पायाभरणीचा मोठा आधार ठरू शकतो. आमदार सुनील शेळके हे लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रमुख रणनीतिकार म्हणून पुढे आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आली आहे. या एकत्रित येण्याचा सरळ फायदा लोणावळ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होणार असून यामुळे नगरपरिषद निवडणूक भाजप विरुद्ध संयुक्त राष्ट्रवादी अशी होणार आहे. लोणावळ्यातील ही नव्याने उभी झालेली राजकीय मैत्री ही निवडणुकीसाठी ‘गेंम-चेंजर’ ठरू शकते.

NCP: शरद पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना त्याच पद्धतीने योग्य तो सन्मान

तर राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाच्या एकत्र येण्यावर अजित पवारांच्या पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याच्या त्यांनी बाबतीत सकारात्मकता दाखवली, त्यामध्ये आम्ही आश्वासन दिले आहे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आदरणीय शरद पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना त्याच पद्धतीने योग्य तो सन्मान दिला जाईल आणि नगरपालिका असेल, वडगावची नगरपंचायत असेल व इतर काही शासकीय कमिटी असतील त्याबाबतीत देखील आपण सकारात्मकपणाने पुढे जाऊन निर्णय घेऊ. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला आहे, या निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी काळात नक्कीच शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान देतील आणि प्रचाराच्या मार्फत पाठबळ देतील, याबाबत आम्ही त्यांच्या आभार व्यक्त करतो असं सुनील शेळके यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नासीर शेख यांनी या युतीबाबत माहिती देताना म्हटलं की, गेल्या चार-पाच दिवसापासून आमची चर्चा चालू होती,  त्यांनी पत्र आम्हाला दिलं होतं, त्याबाबत स्थानिक पातळीवर आम्ही चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही जाहीर पाठिंबा देणार आहोत.

आणखी वाचा

Comments are closed.