घरात आर्टिफिशियल रोपं आणि फुलांची स्वच्छता करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
घराच्या सजावटीसाठी अनेकदा आपण आर्टिफिशियल रोपं आणि फुलं ठेवतो. खऱ्या रोपांची निगा राखणं थोडं कठीण असतं. त्यामुळे अनेकांच्या घरात आर्टिफिशियल रोपं आणि फुलांची सजावट पाहायला मिळते. मात्र सुरुवातीला आकर्षक दिसणाऱ्या या वस्तू कालांतराने घाण होतात. त्यावर जास्त प्रमाणात धूळ साचते आणि त्याचा रंग फिकट दिसायला लागतो. अशा वेळी या वस्तूंची स्वच्छता करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण त्या वस्तू नाजूक असतात. काही टिप्स वापरून तुम्ही पटकन या वस्तू स्वच्छ करू शकता.
कोरड्या कापडाने पुसा
आर्टिफिशियल रोपांवर धूळ लवकर जमा होते, कारण बहुतांश वेळा आपण ते खिडकीजवळ किंवा दाराजवळ ठेवतो. त्यामुळे ते स्वच्छ करण्यासाठी सर्वात आधी कोरड्या कापडाने धूळ हलक्या हाताने पुसून घ्या. पुसताना त्यावर जास्त दाब देऊ नका, कारण त्याची पाने नाजूक असतात. आठवड्यातून एकदा अशा प्रकारे कोरड्या कापडाने धूळ पुसून टाकावी.
कोमट पाणी
जर त्या वस्तू जास्त घाण किंवा धुळीमुळे चिकट झाल्या असतील तर साबणाच्या कोमट पाण्याने हलक्या हाताने पुसून घ्या. नाही तर त्या वस्तू साबणाच्या पाण्यात ५ मिनिटे बुडवून ठेवा आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या. यामुळे त्यावरील धूळ सहज निघून.
हेअर ड्रायर
जर वस्तू हाताळण्यासाठी मोठ्या असतील तर अशावेळी हेअर ड्रायरचा वापर करावा. कारण मोठ्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी वेळही जातो. त्यामुळे हेअर ड्रायरने त्यावरील धूळ सहज निघून जाते. अतिनाजूक वस्तू स्वच्छ करण्यासाठी ही पद्धत प्रभावी ठरते.
हेही महत्त्वाचे:
स्वच्छतेनंतर या वस्तू अशा ठिकाणी ठेवा जिथे जास्त धूळ नसते. एसी किंवा पंख्याच्या थेट हवेपासून दूर ठेवा, कारण यामुळे जास्त धूळ उडते. दर आठवड्याला या वस्तूंची वरवर स्वच्छता करावी आणि महिन्यातून एकदा खोल स्वच्छता केल्याने या वस्तू नव्यासारख्या दिसतात.
Comments are closed.