मुंबई मनपाबाबत भाजपाचा अंतर्गत सर्व्हे, 100 जागा मिळण्याचा अंदाज; पण स्वबळासाठी कसरत करावी लागण
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Election 2025) भाजपनं अंतर्गत सर्व्हे (BJP Survey On BMC Election 2025) केल्याची माहिती समोर आली आहे. याअंतर्गत सर्व्हेमध्ये भाजपाला 100 हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. सध्या महापालिकेत भाजपचे 82 नगरसेवक आहेत. असं असताना भाजपचा विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यावरही डोळा आहे. विरोधकांच्या वॉर्डात भाजप नवी रणतीनी आखण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) शिवसेना आणि काँग्रेसच्या वॉर्डमध्ये भाजपनं चाचपणी सुरु केल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी महापालिकेत भाजपची रणनीती काय आणि त्यांना किती जागा मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं असणार आहे.
मुंबई महापालिकेसाठी भाजपचा अंतर्गत सर्व्हेमध्ये काय? (BJP Survey On BMC Election 2025)
मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 जागा असून स्वबळासाठी 114 जागांची आवश्यकता असते.भाजपानं केलेल्या अंतर्गत सर्व्हेक्षणात 100 पेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहेत. मात्र, स्वबळावर भाजपाला सत्ता राखण्यास अपयश मिळणार असल्याचं सर्व्हेद्वारे समोर येत आहे. महायुतीत लढल्यास फायदा होण्याचा अंदाज, भाजपाच्याच अंतर्गत सर्व्हेक्षणातून स्पष्ट दिसत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक असलेल्या जागांवरही सर्व्हेक्षणात काही जागा भाजपाकडे जाताना दिसत आहेत.
भाजपाला स्वबळासाठी कसरत करावी लागणार- (Mumbai Municipal Corporation Election 2025)
शिवसेना ठाकरे गटाकडे आत्ता 38 माजी नगरसेवक उरले आहेत. यातील 16 जागांवर भाजपाच्या सर्व्हेक्षणात त्यांच्याकडे जात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर काँग्रेसकडे 2017 सालानुसार 31 नगरसेवक निवडून आले होते, यातील जवळपास 8 जागा भाजपला सर्व्हेक्षणात निवडून येत असल्याचं दाखवलं जात आहे. काँग्रेसचे एकूण 10 नगरसेवक 2017 सालानुसार कमी झाले आहेत, यातील 9 नगरसेवक काँग्रेस सोडून गेलेत तर प्रमिला पाटील या नगरसेविकेचा मृत्यू झाला होता. भाजपा आपल्या 82 जागा राखणार असल्याचं सर्व्हेक्षणात स्पष्ट होत असतानाच शिवसेना ठाकरे गटाच्या जागांवरील 16 आणि कांग्रेसच्या 8 जागा मिळून 106 च्या जवळपास भाजपाचा आकडा पोहोचताना दिसतो आहे. मात्र, असं जरी असलं तरी भाजप स्वबळावर मुंबई महापालिका निवडणूक काबीज करु शकणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. अशात, शिंदेंच्या शिवसेनेची गरज भाजपाला मुंबई पालिकेत लागणार असल्याचं स्पष्ट दिसते आहे. अशात, जागा वाटपाच्या चर्चेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत बाजी कोण मारणार? हे बघणं महत्त्वाचं असेल.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.