स्मशानभूमी उजळल्या, कल्याण-डोंबिवलीत 24 तास हायब्रीड सोलर

कल्याण, डोंबिवलीतील काही स्मशानभूमीत यापूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास वाहनांच्या हेडलाईट्सचा आधार घेऊन अंत्यविधी पार पाडण्याची वेळ नातेवाईकांवर यायची. मात्र हा त्रास आता कायमचा दूर झाला आहे. स्मशानभूमीमध्ये हायब्रीड सोलर लाईट्स बसवल्यामुळे 24 तास त्या उजळून निघत आहेत.

14 ऑक्टोबर रोजी महावितरणचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सापर्डे स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी निर्माण झालेल्या अडचणीबद्दल समाजमाध्यमांसह नागरिकांकडून केडीएमसीवर ताशेरे ओढण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी तत्काळ पर्यायी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पहिल्या टप्प्यात केडीएमसीच्या 10 स्मशानभूमींमध्ये 22 हायब्रीड सोलर फिटिंग बसविण्यात येत आहेत. यामध्ये लाल चौकी स्मशानभूमीत तीन, मुरबाड रोडला असलेल्या स्मशानभूमीत तीन, सांगळेवाडी बैलबाजार स्मशानभूमीत तीन, सापर्डे स्मशानभूमीत एक, विठ्ठलवाडी स्मशानभूमीत तीन, यादवनगर स्मशानभूमीत तीन, टिटवाळ्यातील इंदिरानगर स्मशानभूमीत दोन, डोंबिवलीच्या शिवमंदिर स्मशानभूमीत दोन, उंबर्डे स्मशानभूमीत एक आणि बारावे स्मशानभूमीत एक असा समावेश आहे.

पालघर जिल्ह्यातील कामगार नेते संजय पडवळ यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पालघर जिल्हा संपर्कप्रमुख-माजी आमदार विलास पोतनीस, पालघर जिल्हा यंत्रणा प्रमुख अमोल कीर्तिकर, जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, लोकसभा संघटक जनार्दन पाटील, विवेक पाटील, तालुकाप्रमुख प्रथमेश राऊत उपस्थित होते.

Comments are closed.