मेक्सिकोची फातिमा बोश ठरली मिस युनिव्हर्स 2025

थायलंडच्या बँकॉकमध्ये पार पडलेल्या 74 व्या मिस युनिव्हर्स 2025 या स्पर्धेत मेक्सिकोच्या फातिमा बोश हिने यंदा बाजी मारली आहे. फातिमा ही यंदाची मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती ठरली आहे. फातिमाने मिस थायलंड व मिस वेनेझुएलाला मागे टाकत हे विजेतेपद पटकावले.

जगभरातील एकूण 130 देशांच्या सौंदर्यवती यात सहभागी आहेत. गेल्या 19 दिवसांपासून सुरू असलेल्या मिस युनिव्हर्सचा ग्रँड फिनाले शुक्रवारी थायलंडमध्ये सकाळी पार पडला. या स्पर्धेत हिंदुस्थानची मानिका विश्वकर्मा ही टॉप 12 पर्यंतही पोहचू शकली नाही.

Comments are closed.