IND vs SA – शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर; उपचारांसाठी मुंबई गाठणार, गुवाहाटीत पंतच्या हाती टीम इंडियाची कमान

पहिल्या कसोटीत पाहुण्या दक्षिण आफ्रिकेकडून दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. हिंदुस्थानचा कर्मधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे गुवाहाटी कसोटीला मुकणार आहे. त्याच्या अनुपस्थितीमध्ये यष्टीरक्षक बॅटर ऋषभ पंत हिंदुस्थानचे नेतृत्व करताना दिसेल. बीसीसीआयने ‘एक्स’वरून याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीत शुभमन गिल याच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे 22 नोव्हेंबर पासून गुवाहाटी येथे खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीला तो मुकणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने पत्रक काढत दिली.
कोलकाता कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुभमन गिल याच्या मानेला दुखापत झाली होती. दिवसाचा खेळ संपल्यानंतर गिलला तपाणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याला डॉक्टरांच्य निरीक्षणासाठी ठेवण्यात आले होते आणि दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2025 रोजी तो गुवाहाटीला गेला. परंतु दुसरी कसोटी खेळण्यास तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. अधिक तपासणीसाठी तो मुंबईला रवाना होणार असून त्याच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करेल, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले.
🚨 अपडेट 🚨#TeamIndia दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मानेला दुखापत झालेला कर्णधार शुभमन गिल गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.
त्याच्या अनुपस्थितीत दुसऱ्या कसोटीत ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करेल.
तपशील 🔽 | #INDvSA | @IDFCFIRSTBank…
— BCCI (@BCCI) 21 नोव्हेंबर 2025

Comments are closed.