IND Vs SA 2nd Test – वर्कलोड मॅनेज करायचं असेल तर IPL सोडून दे, कर्णधारपदही; शुभमन गिलचे आकाश चोप्राने टोचले कान

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार मानेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो मैदानात उतरला नाही आणि त्याचा फटका टीम इंडियाला सुद्धा बसला. शुभमन गिलच्या दुखापतीवर आता टीम इंडियाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने रोखठोक वक्तव्य केलं आहे.

शुभमन गिल गेल्या सध्या दमदार फॉर्मात आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून तो टी-20, कसोटी आणि वनडे अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडत आहे. तसेच IPL मध्ये त्याच्या खांद्यावर गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदाची सुद्धा जबाबदारी आहे. सध्या शुभमन गिल चांगल्या फॉर्मात आहे त्यामुळे त्याचं संघात असणं संघासाठी फायद्याचं आहे. शुभमन गिलच्या दुखापतीसंदर्भात टीम इंडियाचे माजी खेळाडू आकाश चोप्रा म्हणाले की, “जर तुम्हाला कामाचं व्यवस्थापन करायचे असेल तर, IPL सोडून द्या. जर कर्णधारपदाचा दबाव असेल तर, कर्णधारपद सोडून द्या. माझ्या मते खेळाडूचं फॉर्ममध्ये असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे खेळाडूला जवेढं शक्य आहे, तेवढं खेळलं पाहिजे. कारण खराब कामगिरीला कधी सुरुवात होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे शुभमन गिलने आपल्या सध्याच्या फॉर्मचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि सर्व सामने खेळले पाहिजेत.” असं रोखठोक मत आकाश चोप्रा यांनी व्यक्त केलं आहे.

शुभमन गिलच्या सध्याच्या कामगिरीचा आणि फॉर्मची आकाश चोप्रा यांनी विराट कोहलीच्या सुरुवातीच्या कामगिरीशी तुलना करत ते म्हणाले की, “विराट कोहली आपल्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये तीन्ही फॉरमॅटमध्ये खेळला, कधीच ब्रेक घेतला नाही आणि त्याची खेळाप्रती असलेली तीव्रता कधीही कमी झाली नाही.” असे म्हणत शुभमन गिलने सुद्धा तशाच प्रकारची तीव्रता आपल्या खेळाप्रती दाखवावी असं आकाश चोप्रा म्हणाले आहेत.

Comments are closed.