IND Vs SA 2nd Test – दुखापतीचं ग्रहण! शभुमन गिलच्या पाठोपाठ आणखी एक खेळाडू दुसऱ्या कसोटीतून बाहेर

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये उद्यापासून (22 नोव्हेंबर 2025) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. गुवाहटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर उभय संघांमध्ये सामना खेळला जाणार आहे. या सामन्यातून टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. अशातच दक्षिण आफ्रिकेला सुद्धा आता कॅगिसो रबाडाच्या स्वरुपात मोठा धक्का बसला आहे. राबाडा सुद्धा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे.
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. परंतु पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला अनुभवी वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाची कमतरता जाणवली होती. दुखापतीमुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात तो मैदानात उतरेल, अशी अपेक्षा संघासह चाहत्यांना होती. परंतू आता रबाडा मालिकेतूनच बाहेर पडला आहे. रबाडा अजूनही दुखापतीतून सावरला नाही. दुसरा कसोटी सामना खेळला गेल्यानंतर रबाडा संघासोबत दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होईल. त्यानंतर पुढील चार आठवडे त्याच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार होतील.

Comments are closed.