लग्नाच्या दिवशी नवरीच्या पर्समध्ये ‘या’ गोष्टी हव्याच, एकदा लिस्ट वाचा !

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. ज्यांचं लग्न ठरलेलं आहे त्या मुली खरेदीसह अनेक कामांत गुंतलेल्या असतील. कारण नवरीमुलीला अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. अगदी कपडे, मेकअप, मेहेंदीसह प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून त्या निवडल्या जातात. लग्नासाठी कितीही तयारी केली तरी ऐनवेळी मात्र घाईघाई होते. अशा वेळी नवरीच्या बॅगमध्ये लग्नाच्या दिवशी काही गोष्टी असायला हव्यात. यामुळे ऐनवेळी कोणतीही गडबड होत नाही आणि त्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नसते.

नवरीकडे तिच्या पर्समध्ये हातरुमाल, सॅनिटरी पॅड, टिश्यू पेपर, छोटे हँड सॅनिटायझर आणि वेट वाइप्स असणं गरजेचं आहे. या काही Personal Hygiene च्या वस्तूंची तुम्हाला अचानक गरज लागू शकते. त्यामुळे या वस्तू तुम्ही कॅरी करायला विसरू नका.

टच-अपसाठी मेकअपचे सामान
लग्नाच्या दिवशी मेकअप हा नवरीसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. लग्नात विधी करताना अनेकदा भावुक क्षण येतात, ज्यामुळे डोळ्यात पाणी येते. अशा वेळी पर्समध्ये टच-अपसाठी मेकअपचे सामान असावं. लिपस्टिक, लिप बाम, कॉम्पॅक्ट पावडर आणि आयलाइनर पर्समध्ये ठेवा.

औषधे
जर तुम्ही नियमितपणे एखादं औषधं घेत असाल तर ते तुमच्या पर्समध्ये पॅक करायला विसरू नका. याव्यतिरिक्त डोकेदुखी किंवा पोटदुखीसारख्या सामान्य समस्यांसाठी काही औषधे ठेवा. कारण या दिवसांत तुमच्या आरोग्याची काळजी घेणेही तितकंच गरजेचं आहे. दगदगीमुळं डोकं दुखणं, अपचनाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे औषधं नेहमी जवळ ठेवा.

रोख रक्कम
आजकाल सर्व काही ऑनलाइन होत असले तरी, तुमच्याकडे काही रोख रक्कम असली पाहिजे. कारण सासरचं वातावरण नवीन असल्यानं अचानक काही अडचण आल्यास कोणावर अवलंबून राहण्याची गरज नसते.

सेफ्टी पिन आणि हेअर पिन
सेफ्टी पिन आणि हेअर पिन नवरीसाठी खूप उपयुक्त ठरतात. साडी किंवा लेहेंगा घातल्यावर तुमच्या पर्समध्ये कायम सेफ्टी पिन असाव्यात. तुम्ही कलर सेफ्टी पिनही ठेऊ शकता. याशिवाय हेअरस्टाईल अचानक बिघडल्यास काही हेअर पिन देखील तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे.

Comments are closed.