ऍशेसच्या पहिल्याच दिवशी नक्की काय घडलं? आकाश चोप्रांकडून प्रश्न उपस्थित! जाणून घ्या सविस्तर
जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींसाठी शुक्रवारचा दिवस वेगळाच ठरला. कारण होतं, ऍशेस 2025-26 अंतर्गत पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू झाला. पण पहिल्याच दिवशी जे काही घडलं, त्यातून विशेषतः भारतातील माजी क्रिकेटर आणि चाहत्यांना मजा घेण्याची संधी मिळाली.
अलीकडे ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवरून अनेक पाश्चिमात्य देशांतील क्रिकेटर टीका करत होते, पण पर्थ कसोटीच्या पहिल्याच दिवशी तब्बल 19 विकेट्स कोसळल्यानंतर भारतीयांचे कान टवकारले.
आकाश चोप्राने एकामागून एक असे अनेक संदेश एक्सवर पोस्ट केले. आकाशने पहिला संदेश तेव्हा पोस्ट केला, जेव्हा दिवसाचे 17 विकेट पडलेच नव्हते. त्यांनी लिहिलं, पहिल्या दिवशी 16 विकेट्स आधीच पडल्या आहेत. आज जे घडलं, तसं मी फार वेळा पाहिलेलं नाही. इंग्लंडने टॉस जिंकून फलंदाजी निवडली, तर आता ही पिच खरोखरच बॅटिंगसाठी योग्य म्हणता येईल का? ही अनप्लेयबल बॉलिंग आहे? की खराब फलंदाजी? तुमचा अंदाज काय?
यानंतर 19 विकेट्स पडल्यावर आकाशने आणखी एक संदेश पोस्ट केली. त्यांनी लिहिलं की, जर असं काही भारतात घडलं असतं, तर यालाच कसोटी क्रिकेटचा ‘अंत’ म्हटलं गेलं असतं.
Comments are closed.