आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव! सुपर ओव्हर जिंकत बांगलादेशचा फायनलमध्ये प्रवेश
बांग्लादेशने सुपर ओव्हरपर्यंत गेलेल्या सेमीफायनल सामन्यात भारताला पराभूत केले. आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेतील (Asia Cup Rising Star) या सेमीफायनल सामन्यात बांग्लादेश आणि भारत (BAN vs IND) दोन्ही संघांनी पहिल्या डावात 194 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरमध्ये भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पहिल्याच दोन चेंडूंवर भारतीय फलंदाज बाद झाले. त्यामुळे बांग्लादेशसमोर सुपर ओव्हरमध्ये फक्त 1 धाव करण्याचे सोपे लक्ष्य होते. पण प्रत्यक्षात बांग्लादेशने एकही धाव न करता सुपर ओव्हर जिंकला.
बांग्लादेशने आधी खेळताना 194 धावा केल्या होत्या. त्यांच्या फलंदाजांनी शेवटच्या 2 षटकांत तब्बल 50 धावा केल्या. भारतानेही प्रत्युत्तरादाखल 194 धावा केल्या, त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरमध्ये भारताकडून सुयश शर्मा (Suyash sharma) गोलंदाजीसाठी आला. बांग्लादेशला फक्त 1 धाव हवी होती. सुयशने पहिल्या चेंडूवर गुगली टाकली, ज्यावर यासिर अलीने (Yasir Ali) मोठा फटका मारला. पण सीमारेषेवर रमनदीप सिंगने शानदार कॅच घेतला. सामना पुन्हा थरारक झाला.
पण पुढच्याच चेंडूवर सुयश शर्माकडून वाईड झाला आणि बांग्लादेशला आवश्यक असलेली 1 धाव मिळाली. अशा पद्धतीने बांग्लादेशने कोणतीही धाव न करता सुपर ओव्हर जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.
Comments are closed.