प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या संघ व्यवस्थापनावर अजिंक्य रहाणे नाराज! जाणून घ्या नेमकं काय म्हणाला?
टीम इंडिया (Team india) शुक्रवारपासून गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे (IND vs SA). या सामन्यात भारतासाठी सन्मान व मालिका बरोबरीची लढत असेल. अशा वेळी गंभीर आणि त्यांच्या टीमपुढे मोठं आव्हान आहे, त्यामुळे त्यांना सल्ले, टीका आणि अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे.
आता माजी फलंदाज आणि भारताचे माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) नंबर-3 क्रमाबाबत वारंवार बदल करू नये, अशी विनंती केली आहे. त्याने व्यवस्थापनाला दीर्घकालीन पर्यायावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि त्या जागेसाठी निवडलेल्या फलंदाजाला पुरेसा वेळ देण्याचा सल्ला दिला.
रहाणे अनेक वर्षे भारतासाठी नंबर-5 वर फलंदाजी करत होता. त्यांनी सांगितलं की, नंबर-3 स्थानासाठी जे धोरण वापरलं जात आहे त्यात खूप बदल होत आहेत आणि ते योग्य नाही. खरं पाहिलं तर गौतम गंभीर (Gautam Gambhir) कोच झाल्यापासून व्यवस्थापनाने नंबर-3 वर साई सुदर्शन, शुबमन गिल, करुण नायर आणि आता वॉशिंगटन सुंदर यांना खेळवलं आहे. स्पष्ट आहे की पुजारा टीमबाहेर गेल्यानंतर या जागेसाठी अजूनही स्थिर पर्याय निवडता आलेला नाही.
या विषयावर रहाणेने रविचंद्रन अश्विनच्या (R Ashwin) युट्यूब चॅनेल ‘एश की बात’ मध्ये सांगितलं,
नंबर-३ क्रमासाठी खास तयारीची गरज असते. सतत बदल केल्याने आपण त्या क्रमावर प्रभुत्व मिळवू शकत नाही. मी इथे साई सुदर्शनचे नाव घेईन त्याने 87 आणि 39 अशी चांगली खेळी केली आहे.
रहाणे पुढे म्हणाला, नंबर-3 वर फलंदाजी करताना वेगळ्या कौशल्यांची गरज असते. नंबर-6 किंवा 7 वर खेळताना गरज वेगळी असते. वॉशी (वॉशिंगटन सुंदर) उत्तम खेळाडू आहे, खूप प्रतिभावान आहे, पण नंबर-3 वर त्याला बॅटिंग करणे गोंधळात टाकणारे ठरू शकते. त्यावर विचार होणे गरजेचे आहे. माझ्या मते वॉशी हा बॉलिंग-ऑलराऊंडर आहे.
माजी क्रिकेटपटू पुढे म्हणाला,
जर वॉशिंगटन सुंदरला नंबर-3 वर खेळवायचे असेल, तर त्याला वेगळ्या प्रकारे तयार करावे लागेल आणि व्यवस्थापनाने त्याला अधिक वेळ द्यावा लागेल. खालच्या क्रमावर फलंदाजी करणे आणि नंबर-3 वर खेळणे यात खूप फरक आहे. मग तो वॉशिंगटन सुंदर असो किंवा साई, कोणत्याही खेळाडूला सुरक्षितता आणि स्थिरता देणे खूप महत्त्वाचे असते.
Comments are closed.