भाजप आमदारांचे बंधू बिनविरोध नगरसेवक, मंगळवेढा नगरपालिकेत भाजपनं उघडलं विजयाचं खातं


मंगळवेढा नगरपालिका निवडणूक: मंगळवेढा नगरपालिकेमध्ये आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आमदार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सोमनाथ अवताडे हे बिनविरोध नगरसेवक बनले आहेत. त्यामुळं या निवडणुकीच्या निमित्ताने मंगळवेढ्यात भाजपने विजयी सलामी देत नगरपालिकेत आपले खाते उघडले आहे.  सोमनाथ अवताडे यांच्या विरोधात भरलेले अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेण्यात आल्याने सोमनाथ यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार समाधान आवताडे यांचा आज वाढदिवस असून त्यांच्या भावाने भाजपकडून बिनविरोध विजय होत वाढदिवसाची भेट दिली आहे. सोमनाथ अवताडे निवडून आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवेढ्यात जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. त्यावेळी सोमनाथ अवताडे आणि भाजप समर्थकांनी हालग्याच्या तालावर ठेका धरला. नंतर सोमनाथ अवताडे यांनी बाजार तळावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आपला आनंद साजरा केला.

भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? रोहित पवारांचा सवाल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. काही ठिकाणी नगरपरिषदेच्या आणि नगरपंतायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ठिकाणी रंगतदार लढती होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणच्या नगरपरिषदेत भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)  यांनी भाजपवर टीका केलीय. बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? असा सवाल रोहित पवारांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मामेभाऊ श्री प्रल्हाद कलोती यांची चिखलदरा नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या पत्नी सौ. साधनाताई महाजन यांची जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल, मंत्री जयकुमार रावल जी यांच्या मातोश्री सौ नयनकुवर ताई रावल यांची दोंडाइचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे, परंतु भाजपच्याच जागा बिनविरोध कशा होत आहेत? हा प्रश्न आहे. साम-दाम-दंड-भेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा असल्याचे रोहित पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

जामनेरमध्ये 9 उमेदवार बिनविरोध, 15 जागांवर होणार लढत तर मुक्ताईनगरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट सामना

आणखी वाचा

Comments are closed.