आयपीएल स्टार्स आशिया कपमध्ये सुपर फ्लाॅप, जितेश शर्मा म्हणाला ……

आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 च्या उपांत्य फेरीत इंडिया ए आणि बांग्लादेश ए यांच्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. सामन्यात भारतीय खेळाडूंनी सर्व विभागात चमकदार खेळी खेळली, मात्र शेवटच्या क्षणी सामना हातातून निसटला.

टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय भारतासाठी डोकेदुखी ठरला. बांग्लादेशी फलंदाजांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत 20 षटकांत 6 विकेटच्या बदल्यात 194 धावा ठोकल्या. ज्याध्ये हबीबूर रहमान सोहनची अर्धशतकी (65) आणि एसएम मेहेरोबची नाबाद 48 धावा केल्या.

195 धावांचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. वैभव सूर्यवंशीने केवळ 15 चेंडूत तुफानी 38 धावा ठोकत सामन्यात रोमांच आणला. प्रियांश आर्य (44), जितेश शर्मा (33) आणि नेहल वढेरा (32) यांनीही जबाबदारी घेतली. अखेरच्या चेंडूवर भारताला 4 धावा हव्या होत्या, परंतु केवळ 3 धावा करता आल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपर ओव्हरमध्ये मात्र भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. पहिल्याच दोन चेंडूंवर विकेट गमावल्यानंतर भारतीय संघाला एकमेव धावही वाइडमधून मिळाली. बांगलादेशी गोलंदाजांनी अचूक लाइन-लेंग्थ ठेवत सामन्याचा निकाल पलटवला.

भारताच्या गोलंदाजीत हर्ष दुबेने अचूक मारा करत 4 षटकात 22 धावा देत 1 विकेट घेतली. तर विजयकुमार वैशाखचा महागडा स्पेल (51 धावा) निर्णायक ठरला.

पराभवानंतर कर्णधार जितेश शर्मा म्हणाला, “मी पूर्ण जबाबदारी घेतो. हा पराभव नाही, शिकण्याचा टप्पा आहे. माझी विकेट हा मोठा टर्निंग पॉइंट ठरला. आमच्या खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे. भविष्यात हेच खेळाडू भारतासाठी विश्वचषक जिंकू शकतात,” अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

Comments are closed.