नितीश कुमार यांनी 20 वर्षांनी सोडले गृह खाते, बिहारमध्ये सत्तेचे खरे नियंत्रण भाजपने ओढले

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून जदयूचे नेते नितीश कुमार यांनी शपथ घेतली खरी, मात्र सरकारची सर्व सूत्रे भाजपच्या हाती राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. नितीश कुमार यांनी गृह खाते सोडले असून ते आता भाजपकडे गेले आहे. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे गृह खाते देण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल 20 कर्षांत प्रथमच नितीश कुमार यांच्याकडे गृह मंत्रालय नसेल. नितीश कुमार हे केवळ सरकारचा चेहरा असतील. सत्तेवर नियंत्रण भाजपकडे राहणार आहे.
नितीश कुमार यांना पोलीस विभागाच्या बळावरच सुशासन बाबू म्हटले जायचे. ज्याच्याकडे गृह विभाग, त्याच्याकडेच राज्याची खरी शक्ति असते. ही शक्ति आता भाजपकडे गेली आहे. सम्राट चौधरी यांच्या रूपाने बिहारला नाव गृहमंत्री मिळाला आहे.
महत्त्वाची खाती भाजपकडे
याशिवाय महत्त्काचे महसूल खाते देखील भाजपने उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांना दिले असून कृषी मंत्रालय रामकृपाल यादव यांच्याकडे सोपविले आहे. प्रथमच मंत्री झालेल्या श्रेयसी सिंह यांना क्रीडा खाते दिले आहे. तसेच उद्योग, नगर विकास यासारखी खाती देखील भाजपने स्वत: कडे ओढली आहेत. अर्थ खाते मात्र जदयूकडे असून त्याचा कार्यभार बिजेंद्र यादव यांना दिला आहे.

Comments are closed.