पिंपरी चिंचवडच्या मतदार यादीत घोळ! माजी नगरसेवकासह 1261 मतदारांची नावं गायब, शेकडो मतदारांचे प्


पिंपरी चिंचवड: आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ( Pimpri Chichwad Mahanagarpalika) प्रारूप मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकासह 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब झाली आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं आहे. गायब झालेली ही यादी प्रभाग क्रमांक 1 मध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे. प्रभाग 12चे माजी नगरसेवक पंकज भालेकरांचे स्वतःचे नावच गायब झाल्यानंतर त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. 2024च्या विधानसभेची आणि आत्ताच्या यादीतील फरक दाखवत, भालेकरांनी निवडणूक विभागाची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मी प्रभाग 12 मधून लढण्यास इच्छुक असताना हे घडल्यानं, यामागं भाजपचा हात असल्याचा आणि निवडणूक विभागाला हाताशी धरुन हा कारभार केला गेल्याचा आरोप ही भालेकर करत आहेत. 2017च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या भालेकरांसह अख्ख पॅनल निवडून आलं होतं. त्यावेळी 1800 मतांनी मी निवडून आलो होतो, त्यातील 1200 मतांचं लीड कमी करण्याचा हा डाव आहे का? अशी शंका ही भालेकरांनी उपस्थित केली आहे. ( Pimpri Chichwad Mahanagarpalika)

प्रभागनिहाय याद्या फोडताना मोठ्या प्रमाणात चुकीची नावे, गायब झालेली नोंद व विनाकारण दुसऱ्या प्रभागात टाकलेले मतदार यामुळे नागरिक संतप्त झाले असून, राजकीय नेत्यांनीही आरोप करत याबाबत आक्षेप नोंदवले आहेत. माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचे नावच यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. प्रभाग 12 मधून तब्बल 1261 मतदारांची नावे काढून टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपचे शांताराम भालेकर यांनीही प्रभागातील मोठ्या प्रमाणातील नावे वगळल्याची तक्रार केली. महापालिकेकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर पहिल्याच दिवशी काल (शुक्रवारी दि.21) एकूण 17 हरकती प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये नमुना अ हरकती फ क्षेत्रीय कार्यालयात 3 आणि ह क्षेत्रीय कार्यालयात 13, तसेच नमुना ब हरकतींमध्ये फक्त क क्षेत्रीय कार्यालयात 1 हरकत निवडणूक विभागाकडे प्राप्त झाली आहे.

Pimpri Chichwad Mahanagarpalika: प्रभाग 6 मध्ये मोशी, कुदळवाडीतील नावे

प्रभाग 6 मध्ये मोशी आणि कुदळवाडी परिसरातील मतदारांची नावे घालण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर प्रभाग 16 मधील काही मतदारांची नावे चुकून प्रभाग 17मध्ये टाकली गेल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे

Pimpri Chichwad Mahanagarpalika: प्रभाग 1 मधील मतदारांना 11 मध्ये घातलं

चिखली प्रभाग क्रमांक 1 मधील पूर्णानगर, कृष्णानगर, घरकुल येथील मतदारांची नावे प्रभाग 11 मध्ये टाकल्याची चर्चा रंगली आहे. इतर प्रभागांतील मतदारांना प्रभाग 1 मध्ये टाकण्यात आल्याने या प्रभागातील संख्या तब्बल 74,340 पर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते.
मोरेवस्तीतील सामाजिक कार्यकर्त्या योगिता रणसुभे आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव प्रभाग 1 ऐवजी 11 मध्ये टाकल्यामुळे राष्ट्रवादीचे शहर मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे यांनी नाराजी व्यक्त केली. “प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी न केल्यामुळे हा गोंधळ झाला,”  असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.