क्रिप्टो मार्केटमध्ये भूकंप, अवघ्या 24 तासांत 17 लाख कोटी स्वाहा

गेल्या 24 तासांत क्रिप्टो मार्केटमध्ये चढ-उतार झाल्याने गुंतवणूकदार कमालीचे चिंतेत पडले आहेत. जागतिक क्रिप्टो करन्सी मार्केट कॅप 6 टक्क्यांहून अधिक घसरून 3 लाख कोटी डॉलरच्या खाली आला आहे. बिटकॉइन, इथेरियमसह प्रमुख क्रिप्टो करन्सीमध्ये मोठी घसरण झाली आहे. कॉइनमार्केटकॅपच्या आकडेवारीनुसार, क्रिप्टो मार्केट कॅप 3.14 लाख कोटी डॉलरवर होता. तो आता 2.95 लाख कोटी डॉलरपर्यंत खाली आला आहे. अवघ्या 24 तासांत गुंतवणूकदारांचे जवळपास 17 लाख कोटी रुपये पाण्यात बुडाले आहेत. फियर एन्ड ग्रीड इंडेक्ससुद्धा 11 वर आला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये मोठी चिंता असून गुंतवणूकदार वेगाने क्रिप्टोची विक्री करत आहेत. बिटकॉइन 24 तासांत 7 टक्क्यांहून अधिक घसरून 90 n हजार डॉलरच्या खाली आला आहे.

सर्व क्रिप्टोत घसरण
कॉइनमार्केटकॅपनुसार, टॉपच्या 100 क्रिप्टो करन्सीमध्ये एकही क्रिप्टोमध्ये वाढ झाली नाही. सर्वच्या सर्व कॉइन्समध्ये घसरण झाली आहे. काही कॉइन्समध्ये 10 ते 20 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. त्यात टॉन कॉइन, पॅन्टॉन, नियर प्रोटोकॉल, स्टार्क नेट, डॅश, स्टोरी, मोर्फो, एमवायएक्स फायनान्सचा समावेश आहे.

Comments are closed.