US Firing – अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये गोळीबार, दोघांचा मृत्यू; अनेक जण जखमी

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. कॉनकॉर्डच्या वार्षिक ख्रिसमस ट्री लाइटिंग समारंभात गोळीबार झाला. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कॉनकॉर्ड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. गोळीबार कुणी आणि कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप समजू शकले नाही.

कॅरोलिनातील कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर असलेल्या कॉर्बिन अव्हेन्यूजवळील युनियन स्ट्रीटवर शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला, असे पोलिसांनी सांगितले. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत गोळीबार आणि नागरिक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. गोळीबाराच्या घटनेमुळे शहरातील इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Comments are closed.