स्टार्कची भीमकामगिरी! WTC इतिहासात हे यश मिळवणारा फक्त तिसरा गोलंदाज, भारतीय खेळाडू जवळपासही नाही
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील पहिला सामना पर्थ स्टेडियमवर खेळला जात होता. पहिल्या दिवशी एकूण 19 बळी पडले, तर दुसऱ्या दिवशीही हाच ट्रेंड कायम आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जो रूटची विकेट घेत त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला. ही विकेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात स्टार्कची 200वी विकेट होती.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्थापनेपासून, प्रत्येक आवृत्तीत स्टार्कने चांगली कामगिरी केली आहे, पर्थ टेस्ट मॅच सुरू होण्यापूर्वी स्टार्कने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात एकूण 191 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या पर्थ कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 7 बळी घेतले, तर दुसऱ्या डावात दुसरा बळी घेताच, तो वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात 200 बळी पूर्ण करण्यात यशस्वी झाला. मिचेल स्टार्क हा आतापर्यंतचा हा टप्पा गाठणारा तिसरा गोलंदाज आहे, ज्याच्या आधी नॅथन लायन आणि पॅट कमिन्स हे हे यश मिळवण्यात यशस्वी झाले. स्टार्कने आतापर्यंत WTC इतिहासात एकूण 50 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तो 200 हून अधिक बळी घेण्यात यशस्वी झाला.
WTC इतिहासात सर्वाधिक विकेचट्स
नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया) – 219 बळी
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) – 215 बळी
मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) – 201 बळी
रविचंद्रन अश्विन (भारत) – 195 बळी
जसप्रीत बुमराह (भारत) – 183 बळी
इंग्लंडविरुद्ध पर्थ कसोटीत मिचेल स्टार्कने कहर केला. दुसऱ्या दिवशी त्याने बेन स्टोक्सची विकेट घेतली तेव्हा तो अॅशेसच्या इतिहासात एका सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तिसरा डावखुरा वेगवान गोलंदाज बनला.
Comments are closed.