आठवड्यातील कोणत्या दिवशी डी-मार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं? जाणून घ्या ट्रिक


DMart विक्री: डीमार्ट हा सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय ग्राहकांचा आवडता पर्याय मानला जातो. किराणा, कपडे आणि घरगुती वस्तू येथे MRP पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असल्याने येथे खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र अधिक बचत करायची असल्यास कोणत्या दिवशी खरेदी फायदेशीर ठरेल, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. डीमार्टमध्ये रोजच काही ना काही वस्तूंवर सवलत असते, परंतु कोणत्या दिवशी कोणती वस्तू स्वस्त मिळेल याचे ठरलेले वेळापत्रक नसते. बहुतेक वेळा बाजारभावापेक्षा कमी दरात वस्तू मिळतात, त्यामुळे “हा दिवसच सर्वात स्वस्त” असे निश्चित सांगता येत नाही. तरीही मोठ्या सवलती आणि Buy One Get One सारख्या खास ऑफर्स विशिष्ट दिवशी किंवा सणासुदीच्या काळात जास्त दिसतात.

DMart Sale : मोठी खरेदी करायची असल्यास सणांचा काळ सर्वाधिक फायदेशीर

शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी स्टोअरमध्ये मोठी गर्दी असते आणि त्यावेळी विविध उत्पादनांवर विशेष ऑफर्स आणल्या जातात. किराणा, कपडे, स्किनकेअर, घरगुती वस्तू यावर या दिवसांत चांगल्या सवलती मिळतात. दिवाळी, दसरा, होळी, ख्रिसमसनवीन वर्ष असे प्रमुख सण जवळ आल्यावर Buy One Get One सारख्या आकर्षक योजना अधिक प्रमाणात लागू होतात. त्यामुळे मोठी खरेदी करायची असल्यास सणांचा काळ सर्वाधिक फायदेशीर मानला जातो.

DMart Sale : वेळोवेळी ॲप तपासणे फायदेशीर

काही डीमार्ट स्टोअर्समध्ये रविवारीनंतर उरलेल्या स्टॉकची जलद विक्री करण्यासाठी क्लिअरन्स सेलही लावला जातो. या सेलमध्ये निवडक वस्तूंवर अतिरिक्त सवलत दिली जाते, जर तुम्ही D-Mart Ready ॲपद्वारे ऑनलाईन खरेदी करत असाल, तर सोमवार किंवा बुधवार या दिवशी खास ऑनलाइन डील्स आणि कूपन्स उपलब्ध होऊ शकतात. मात्र या ऑफर्स फक्त ॲपवरच लागू असतात, त्यामुळे वेळोवेळी ॲप तपासणे फायदेशीर ठरते.

DMart विक्री: शुक्रवार – सेलची सुरुवात, गर्दी कमी

शक्यतो शुक्रवारपासूनच नवीन सेल सुरू होतो. बिल्डिंगजवळील बोर्डवर ‘Weekend Special’ असे बोर्ड दिसतील. किराणामाल, तेल, डाळी, साबण या दिवशी स्टॉक भरपूर असतो, गर्दी कमी असते. पहिल्या दिवशी खरेदी केली तर आवडीचे ब्रँड मिळण्याची शक्यता जास्त असते. डीमार्ट रेडी अॅपवरून ऑनलाइन ऑर्डर केली तर घरपोच मिळते आणि डिस्काउंट कूपनही लागू होतात.

DMart विक्री: शनिवार – पीक डे

शनिवार हा डीमार्टचा पीक डे आहे. सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत मोठी गर्दी होत असते. पण याच दिवशी बाय 1 गेट 1 , ५०% ऑफ आणि कॉम्बो पॅक जास्त असतात.

DMart विक्री: रविवार- विकेंडचा शेवटचा दिवस

रविवार हा क्लोजिंग डे असतो. जे स्टॉक उरलेले असते, त्यावर एक्स्ट्रा १०-२०% सूट मिळते. भाज्या, फळे, दूध पावडर अशा काही गोष्टी स्वस्त असतात.

आणखी वाचा

Comments are closed.