T20 WC 2026: टीम इंडियाचा ग्रुप ठरला! पाकिस्तानसह ‘हे’ दमदार संघ भिडणार
टी 20 वर्ल्ड कप 2026 साठी संघांचे गट जवळपास अंतिम झाल्याचे संकेत मिळत आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत आणि त्यांना 5-5 संघांच्या चार गटांमध्ये विभागण्यात येणार आहे. गटांची ही रचना जवळपास निश्चित झाली असून, आयसीसीकडून अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
यजमान भारताला तुलनेने सोपा गट मिळाल्याचे समजते, तर सह-यजमान श्रीलंकेला कठीण गट मिळण्याची शक्यता आहे. भारताच्या गटामध्ये पाकिस्तानचा समावेश असल्याने दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये किमान एक सामना होणार हे निश्चित झाले आहे.
क्रिकबझच्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तानबरोबर USA, नामिबिया आणि नेदरलँड्स या संघांचाही समावेश आहे. या गटात फक्त भारत आणि पाकिस्तानच कसोटी खेळणाऱ्या संघांमध्ये मोडतात.
सह-यजमान श्रीलंकेचा गट खूपच कठीण असेल. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमान हे संघ असतील. हा गट ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हणून ओळखला जाऊ शकतो, कारण येथे चार कसोटी खे्ळणारे संघ आहेत.
ग्रुप सी – इंग्लंड, वेस्ट इंडीज, इटली, बांग्लादेश, नेपाळ
ग्रुप डी– दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, UAE, कॅनडा
या दोन्ही गटांतही प्रत्येकी तीन कसोटी प्लेइंग संघ आहेत.
सुपर-8 आणि नॉकआउट फॉरमॅट
प्रत्येक गटातून टॉप 2 संघ सुपर-8 मध्ये पोहोचतील. त्यानंतर नवीन दोन गट बनवले जातील आणि त्यातील टॉप 2 संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवतील. दुसऱ्या फेरीचे सामने 15 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
भारतातील मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि अहमदाबाद येथे सामने खेळले जाणार आहेत. श्रीलंकेत कोलंबो आणि कँडी ही शहरे यजमानपद भुषवतील.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फायनल आयोजित केला जाईल. मात्र पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहोचला तर अंतिम सामना श्रीलंकेत खेळला जाऊ शकतो.
Comments are closed.