विठाबाईच्या भूमिकेसाठी श्रद्धा कपूरने वाढवले 15 किलो वजन, लावणी करताना पाय झाला फ्रॅक्चर

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही सध्या पाय फ्रॅक्चर झाल्याने शूटींगमधून ब्रेक घेऊन घरी आराम करत आहे. विठा या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान लावणी करत असताना तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. श्रद्धाच्या आरामासाठी 15 दिवस या चित्रपटाचे शूटींग पुढे ढकलण्यात आले आहे.
लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारीत लक्ष्मण उतेकर यांच्या विठा या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे नाशिक येथे शूटींग सुरू होते. एका लावणीसाठी श्रद्धा कपूर नव्वारी व मराठमोळे दागिणे घालून तयार झालेली. मात्र ढोलकीच्या तालावर फेर धरलेला असतानाच श्रद्धाचा पाय मुरगळला. काही वेळ आराम केल्यानंतर श्रद्धाने पुन्हा कामाला सुरुवात केली. ती नाशिकचे शूटींग पूर्ण करून मुंबईतही परतली. मात्र इथे आल्यावर तिच्या पायाचे दुखणे वाढले. त्यामुळे ती डॉक्टरकडे गेली असता त्यांनी पाय फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित विठा या चित्रपटाचे शूटींग 1 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आले आहे. या चित्रपटाचे विठा हे नाव निश्चित नसून लवकरच नवीन नाव जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

Comments are closed.