हिंजवडीत पुन्हा RMC ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू; आठवड्याभरात दुसरी घटना, कासारसाईला जाऊन फिरू


पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरालगतच्या हिंजवडी मारुंजी परिसरात कसारसाई धरणावरून पर्यटन करून घरी परतत असताना दुचाकीला रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Hinjewadi Accident News) 19 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रीदा इमरान खान असे मृत्यू (Hinjewadi Accident News) झालेल्या तरुणीचे नाव आहे. मिक्सर ट्रकच्या धडकेने अपघात होण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. (Hinjewadi Accident News)

Hinjewadi Accident News: मारुंजी परिसरात आले असता मागून त्यांना आरएमसी ट्रकने धडक दिली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत तरुणी रीदा आणि तिचा मित्र विवेक हे दोघे पुण्याहून कासारसाई परिसरामध्ये पर्यटनासाठी आले होते. पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर पुण्याच्या (Hinjewadi Accident News) दिशेने परतत असताना मारुंजी परिसरात आले असता मागून त्यांना आरएमसी ट्रकने धडक दिली, या धडकेत दुचाकीवरील रिदा खाली पडली व तिचा या घटनेत दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेनंतर तात्काळ हिंजवडी पोलिसांनी आरएमसी ट्रकचा चालक अजमल अख्तर अन्सारी याला अटक केली असून त्याच्यावरती हिंजवडी (Hinjewadi Accident News) पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. वारंवार आरएमसी ट्रकमुळे होणाऱ्या अपघातांमुळे पोलीस प्रशासन आता काय कठोर भूमिका याबाबत घेणार हे पाहणे देखील आता महत्त्वाचा असणार आहे.(Hinjewadi Accident News)

Hinjewadi Accident News: हिंजवडीमध्ये डंपरच्या धडकेत बापलेकीची ताटातूट, लेकीचा मृत्यू

हिंजवडी आयटी परिसरात अवजड वाहनांच्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी दि.१७ दुपारी डम्परच्या धडकेत चाकाखाली चिरडल्याने हिंजवडीतील एका २० वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू (Hinjewadi Accident News)झाला. तन्वी सिद्धेश्वर साखरे (वय २०, रा. फ्लॅट नं. ०४, मुक्तानंद हाइट्स, गावठाण रस्ता, हिंजवडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. डंपरचालक अजय अंकुश ढाकणे (वय २०, रा. जांबे) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(Hinjewadi Accident News)

मृत तरूणी तन्वी ही आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून (एमएच- १४, केव्ही- ३८८३) जांबे येथील आर-१६, कोलते पाटील, न्यू सर्कल परिसरातून मारुंजीच्या दिशेला जात होती. यावेळी पाठीमागून आलेल्या डंपरच्या धडकेत (एमएच- १४, एचयू- ९८५५) चाकाखाली येऊन तन्वीचा मृत्यू झाला. अपघातात तिचे वडील जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी फॅशन डिझायनरचा कोर्स करत होती. तिला एक लहान बहीण असून, वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. (Hinjewadi Accident News)

आणखी वाचा

Comments are closed.